

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) - गणेश कला क्रिडा रंगमंच ही वास्तू म्हणजे
सांस्कृतिक पुण्याची शान आहे. अडीच हजार आसन क्षमतेचे हे रंगमंदीर फक्त खेळासाठी
वापरावे म्हणून क्लब आॅफ महाराष्ट्रने उच्च न्यायालयातून बंदी आणली आहे. त्यामुळे
गणेश कला क्रिडा 10 आॅगस्टपासून बंद करण्यात आल्याने पुणे महापालिकेचे सुमारे
22 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हे रंगमंदीर बंद आहे हे महिती असूनही त्याच्या
किरकोळ दुरूस्तीचे व रंगरंगोटीचे 50 लाख रूपयांचे टेंडर काढले असून ठेकेदाराल काम
देण्यात आले आहे.
ठेके
दाराने काम सुरू केल्यानंतर ही बाब काही अधिका-यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी
काम थांबवण्यास सांगितले. काम अर्धवट अवस्थेत आहे असे दिसते. सुमारे अडीच
हजार आसन क्षमतेचे पुण्यातील गणेश कला क्रिडा हे पहिले रंगमंदीर आहे. महापालिकेने
ते बांधले आहे. सुरूवातीला खासदार कलमाडींच्या पुणे फेस्टीव्हलसाठी केवळ रंगमंच
बांधण्यात आले. त्यानंतर प्रेक्षागृह बांधण्यात आले. त्यात गारव्यासाठी खास
वातानुकुलीत यंत्रणा बसवण्यात आली. या रंगमंदीराला जोडूनच प्रदर्शनासाठी मोठे हाॅल
बांधण्यात आले आहेत.
या गणेश कला क्रिडासाठी दिवसाला 21 हजार रूपये भाडे आकारण्यात येते.
सुरूवातीला याच्या आकारमानामुळे येथे मर्यादित कार्यक्रम होत असत पण तेथे अद्ययावत
प्रेक्षागृह झाल्यावर कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षात येथे अॅडव्हान्स
बुकिंग होऊ लागले आहे. तसेच येथे होणा-या कार्यक्रमांची संख्याही वाढून त्यात
विविधताही दिसू लागली.
या जागेचे मालक क्लब आॅफ महाराष्ट्र आहे. त्यांनी स्टेडियम बांधण्यासाठी पुणे
महापालिकेला जागा दिली आहे. तसेच या नेहरू स्टेडियमच्या बाहेरच्या भागात देशी
खेळांच्या सरावासाठी जागा होती. त्यामुळे येथे आरक्षण खेळाचेच होते. पण पुणे महापालिकेने हा भव्य रंगमंच बांधताना त्याचे नाव श्री गणेश कला क्रिडा रंगमंच असे ठेवले.
इतका खर्च महापालिकेने त्यासाठी केल्यावर आता क्लब आॅफ महाराष्ट्रला जाग आली व
त्यांनी उच्चन्यायालायात दाद मागत या रंगमंदीरावर बंदी आणली. या क्लबच्या विद्यमान
पदाधिका-यांपैकी काहीजण ज्यावेळी श्री गणेश कला क्रिडा रंगमंच उभा रहात होता
त्यावेळी पुणे महापालिकेत नगरसेवक होते. खेळाचे आऱक्षणाच्या जागी असे रंगमंदीर
बांधता येत नाही हे त्यांनाही महिती होते पण ते त्यावेळी क्लबचे कोणीही नव्हते. असा
हा खेळ रंगला असला तरी त्यात नुकसान पुणेकर रसिकांचे होत आहे.
त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी पत्र पुणे महापालिकेला दिले
आहे. त्यात रंगमंदीर बंद झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून कार्यक्रम
करणा-या संस्था व पुणेकर रसिकांचेही नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण असा
सवाल केला आहे. रगमच खुला करून द्यावा व संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी
अशी मागणी त्यांनी केली आहे. रंगमंच खुला न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या