

पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) - पुण्यातील जंगली महाराज रोडवरील एअर होस्टेस
अॅकॅडमी या संस्थेविरूद्ध पोसिलांनी गुन्हा दाखल केला आहे. संस्थेचा कारभार पैसे
उकळण्याचा असून त्याचे अमेरिकेतील संलग्नत्व बोगस असल्याचे उघडकीस आल्याने 75 सुशिक्षत मुलींचे एअर होस्टेस होण्याचे स्वन्प पहिल्या उड्डणापूर्वीच हवेत विरले आहे.
पुण्याच्या जंगली महाराज रोडवर ही एॅकॅडमी असून तेथे यंदा 75 मुलींना प्रवेश दिला
होता. त्यावेळी मुलींना एअर होस्टेस होऊन परदेशात हिंडण्याची स्वन्प दाखवून
त्यांच्याकडून लाखो रूपये घेऊन प्रवेश देण्यात आला होता. काॅलेज सुरू झाल्यावर
हळूहळू आपल्याला प्रवेशाच्या वेळी सांगितलेल्या गोष्टी मिळत नसल्याचे मुलींच्या लक्षात
आले. तसेच संस्थेत शिकवणयाचे काम करणा-यांनाही दोन महिन्यांचा पगार
देण्यातआलेला नाही असे लक्षात येताच मुलींना त्या बाबत विचारणा सुरू केली, तर
त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांना अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला.
या सर्व मुली चांगल्य शिकलेल्या आहेत. त्यांनीही प्रवेश घेताना संस्थेची साधी चै
ाकशी कऱण्याचे भान राखले नाही. इतकेच नव्हेतर या संस्थेने अमेरिकेतील ज्या
संस्थेशी संलग्नता दाखवली आहे ती इंटरनेटवर बघण्याचा शहाणपणा दाखवला नाही.
त्यामुळे अखेर त्यांच्यावर फसवणूक करून घेण्याची वेळ आली. मनसेचे राज ठाकरे
यांचीही मुलींना भेट घेऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे मनसे,
सेना व राष्ट्रवादी असे पक्ष संस्थेविरूद्ध आंदोलनात उतरल्याने पोलिसांना संस्थेविरूद्ध गुन्हा
दाखल करावा लागला. पोलिसांनी केलेल्या चाैकशीत संस्थेचे संलग्नत्व बोगस असल्याचे
िनष्पन्न झाले आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या