Skip to content
जाहिरात

अनैतिक संबंधातून मुलीचा खून, पुरावा नष्ट केला

October 29, 2009

पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) - पुण्याच्या नारायण पेठेत अल्पवयीन मुलीचा खून घरमालक व मोलकरणीच्या अनैतिक संबंधातून झाला आहे.मात्र घरमालक मोहिनाराज कुलकर्णी यांनी पुरावा अक्ल हुशारीने नष्ट केल्याचे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

नारायण पेठेतील परांजपे क्लिनिकच्या शेजारी असलेल्या यशदीप बंगल्यात ही घटना
घडली आहे. मोहीनीराज कुलकर्णी (वय 79) यांच्या घरी हंथरूणावर असलेल्या
पत्नीची देखभाल करण्यासाठी असलेल्या रेखा अनिल रणदिवे हीची मुलगी रोहिणी (वय
10) हीचा खून झाला आहे. रेखा ही घरकाम करणारी असून अंबिल ओढा झापडपट्टीत
रहाते. तिला दोन मुली आहेत.
मोहनीराज व रेखा यांचे अनैतिक संबंध होते. रेखा, रोहिणीचा मुक्काम कुलकर्णी
यांच्या घरी होता. त्यात मोहनीराज याना कंडोम वापरून रोहिणीवर बलात्कार केला.
त्यानंतर तिचा खून केला. खून केल्यावर त्याने पुरावा नष्ट केला. त्यासाठी काॅस्टीक
सोडा, डेटाॅलचा वापर केला. यात रोहिणीची आई रेखा हिलाही सामील करून घेतले.
या प्रकरणातील अनेक गोष्टींची कबुली रेखा हिने दिली आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.