

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्यात गणेशोत्सवात असलेला स्वाइन फ्लू निवडणूक आणि
दिवाळी पहाट, पाडवा पहाट, महोत्सव, शॅापिंग फेस्ट मध्ये सर्वजण विसरले होते.
पण आता थंडीत पुन्हा त्याचा उद्रेक होण्याची शक्यता सरकारी अधिकारीच बोलून दाखवत
आहेत. तशात काही ज्योतिषांनी तसे भाकीत करून अधिका-यांच्या म्हणण्याला दुजोरा
दिला आहे. पण आज अशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यायला सरकारी यंत्रणा सज्ज
नसल्याचे उघड झाले आहे.
एकीकडे आपणच म्हणायचे दुसरीकडे काहीच तयारी नसल्याचे सांगायचे अशी डबल
ढोलकी अधिकारी वाजवत असल्याचे संदीप खर्डेकर यांनी महिती अधिकारात मागवलेल्य
महितीवरून सिद्ध झाले आहे. नायडू रूग्णालयाची संयुक्त पहाणी ससूनचे डीन व
महापालिका आय़ु्क्तांनी केली. त्यात तेथे काय करावे लागेल याची तपशीलवार महिती
महापालिकेला देण्यात आली. ती सर्व पूर्ण करणे महापालिकेला शक्य नसल्याने त्यांनी
शासनाकडे मदत मागितली आहे.
अशी मागणी करणारे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी राज्य शासनाच्या
आरोग्य विभागाला पाठवले आहे. त्यात जास्तीची यंत्रणा निर्माण कऱण्यासाठी 184
कोटींची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी सुमारे 72 कोटी रूपये बांधकामासाठी तर
108 कोटी यंत्रणा उभी करण्यासाठी लागणार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. हे पत्र
सप्टेंबर महिन्यात पाठवले असून त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
गणेशोत्सवापूर्वी आणि त्या काळातही सर्वच माध्यमांनी स्वाइन फ्लूच्या बातम्यांना
त्यातही त्यामुळे मरण पावलेल्यांना ठळक प्रसिद्धी माध्यमांनी दिली. अशी प्रसिद्धी
देणा-यांपैकी अनेकांना निवडणुकीत पॅकेज व पेड न्यूज करायच्या असल्याने त्यांनी स्वाइन
फ्लूच्या बातम्यांना कमी महत्व देण्यास सुरूवात केली. त्यानंतर आलेल्या दिवाळीत
काहींचे दिवाली पहाट, शाँपिंग फेस्ट सारखे कमर्शियल उप्रकम असल्याने त्यांनी स्वाइन
फ्लूच्या बातम्या ठळकपणे प्रसिद्ध न करता कुठेतरी नजरेत येणार नाहीत अशाप्रकारे प्रसिद्धी
दिली. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, माँल्स, मल्टीफ्लेक्स अशा गर्दीच्या ठिकाणी
तुडुंब गर्दी आजही होत आहे. पण आता पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेनेच स्वाइन फ्लूची
हकाटी सुरू केली आहे.
दरम्यानच्या काळात पुणे शहरात डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढू लागली. त्यात काही
रूग्ण डेंग्युमुळे मरण पावले. त्यामुळे त्याचे गांभिर्य स्वाइन फ्लू इतके असूनही त्याला
मात्र फारशी प्रसिद्धी दिली गेली नाही. यातील प्रमुख कारण म्हणजे स्वाइन फ्लू हा
उच्चमध्यम व उच्च वर्गाच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झालेला अढळून आले तर डेंग्युचे
रुग्ण ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा गरीब वस्त्यांमध्ये अढळून आले आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या