

पुणे, (प्रतिनिधी) - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची दुसरी घटना येरवड्यात घडली आहे. ती मुलगी फक्त अडीच वर्षाची असून केवळ मामा...मामा असा शब्द बोलत आहे.
येरवड्यातील जेजे अर्पाटमेंटमध्ये असलेल्या कचरा कुंडीजवळ ही मुलगी बुधवारी सकाळी
बेशुद्ध अवस्थेत मिळाली. तिच्या अंगावर कप़डे नव्हते. तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न
झाले पण ती शुद्धीवर आली नाही.
अखेर तिला ससूनमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत
तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली
असता मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तिला कोणीतरी च़ॉकलेट देण्याच्या बहाण्याने
नेल्याची बाब पुढे आली आहे. ती मुलगी शुद्धीवर आली असून केवळ मामा..मामा असे
शब्द बोलत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी मागिल महिन्यात अशीच घटना येरवड्यात घडली होती. त्याच दिवशी
नारायणपेठेत घरमालकाने कामवाल्या बाईच्या लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खून
केला होता.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या