Skip to content
जाहिरात

अमेरिकेतील बापाने पुण्यात रचला मुलाच्या अपहरणाचा बनाव

November 19, 2009

पुणे, (प्रतिनीधी) - अनिवासी भारतीय असून अमेरिकेत वातव्य असलेल्या खन्ना दांपत्याचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर यातील बापाने आपल्याच मुलाच्या अपहरणाचा पुण्यात बनाव रचल्याचे त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून उघड झाले आहे.

याची हकीकत अशी, नितीन मनोहरलाला खन्ना हा अनिवासी भारतीय असून तो अमेरिकेत पत्नी तारा व लहान मुलगा केविन यांच्या बरोबर रहात होता. या दांपत्याचे दोन फ्लॅट पुण्यात आहेत. दरम्यान, या नितीनने घटस्फोटासाठी अमेरिकेच्या न्यायालयात अर्ज केला होता.
त्या अर्जावर निकाल देताना तुमचे पुण्यात असलेले दोन फ्लॅट विका व पैसे वाटून घ्या, त्याच प्रमाणे मुलाचा ताबा न्यायालयाने आई तारा यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे तारा या गेले काही महिने पुण्यात सेनापती बापट रोडवरील फ्लॅटमध्ये रहातात. त्यांचा मुलगा केविन कोंढव्याच्या शाळेत जातो.
गेल्या महिन्यात कोढव्यात शाळेची बस आडवून एका मुलाचा अपहरण झाल्याची घटना झाली होती. ज्याचे अपहरण झाले तो केविन या नितीन व तारा यांचा मुलगा असल्याची बाब काल उघड झाली. यातील नितीन यानेच चारपाच जणांच्या मदतीने केविनचे अपहरण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. कारण ज्यावेळी केविनचे अपहरण झाले त्यानंतर तारा यांनी तशी तक्रार पोलिसांकडे दिली आहे.
या अपहरणानंतर काही दिवसांनी केविन हा नितीनकडे अमेरिकेत असल्याचे ताराच्या लक्षात आले. केविनचा पासपोर्ट हा तारा यांच्याकडे असल्याने तो तिकडे गेलाच कसा असा संशय तारा यांना आल्याने त्यांनी अखेर चतुशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानतर पोलिस तपासात काही धक्कादायक बाबी पुढे आल्या.
केविनचे अपहरण केल्यावर त्याला अमेरिकेत न्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी नितीनने केविनचा पासपोर्ट हरवला असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्याचे वेगळे कागद तयार केले आणि त्यावर केविनचा पासपोर्ट काढला. त्यावेळी केविनची सहीही नितीननेच केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे नितीन विरूद्ध कोंढवा पोलिसांनी अपहरणाचा तर चतुशृंगी पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढल्याबद्दल नितीनसह प्रवीण खन्ना, विजय चढ्ढा व फर्नांडीस यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील प्रवीण, विजय व फर्नांडीस हे पिपळे गुरव येथे रहातात.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.