

पुणे, (प्रतिनिधी) - शहरातील पाच मोबाइल कंपन्यांकडे मिळकत कराची 10.76 कोटींची थकबाकी असून पुणे महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वसमान्य नागरीकांनी मिळकत कर थकवला तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उघारणारी महापालिका या भांडवलदारांच्या कंपन्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुण्यातील पाच मोबाइल कंपन्यांकडे मिळकत कराची ही थकबाकी आहे. ही थकबाकी 2002 पासूनची असून त्यातही रिलायन्सचे नाव आहे. रिलायन्सकडे मिळकत कराची थकबाकी 2.19 कोटी रूपयांची आहे. त्या शिवाय टाटा इंडिकॉमकडे 1.80 कोटी, वडाफोनकडे 1.55 कोटी, आयडियाकडे 1.55 तर सर्वाधिक थकबाकी एअरटेलकड़े 3.83 कोटी रूपयांची आहे.
शहरात या मोबाइल कंपन्यानी एकूण 589 टॉवर उभे केले आहेत. त्यापैकी 200 टॉवर अनधिकृत आहेत. या मोबाइल कंपन्यांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या