

पुणे, (प्रतिनिधी) - सकाळच्यावेळी फिरण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरीकांना एकटे गाठून पोलिस असण्याच्या बहाण्याने त्यांना लूटणाच्या घटनां वाढल्याने पेन्शनर्स पॅरेडाइज असलेल्या पुण्यात असुरक्षितता वाढत आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवसात चार घटना घडल्या होत्या सोमवारी दोन तासात तीन घटना घडल्या आहेत.
सकाळी एसएनडीटी कॅनॉल रोडवर वृद्ध महिलेचे पस्तीस हजारांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर अवघ्या तासात म्हात्रे पुलाजवळच्या डीपी रोडवर वृद्ध नागरीकाची अंगठी काढून घेण्यात आली. त्यानंतर पाषाण जवळच्या सूस रोडवर असेच महिलेला लूटण्यात आले. या घटनात पोलिस असल्याची बतावणी करून एकूण चोरट्यांनी लाखाचा ऐवज कमावला.
मित्रमंडळ चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास मित्राची वाट बघत उभ्या असलेल्या तरूणाला रिक्षेतून आलेल्या दोघांनी पोलिस असल्याचे सांगून रिक्षेतून त्याला सिटीपोस्ट चौकात नेले. तेथून दुसरी रिक्षाकरून त्याला घेऊन न्यायालया समोरच्या रेल्वे रूळांच्या सीमाभिंतीजवळ नेले. त्याच्याकडून 27 हजार रूपये, दागिने व मोबाइल असा दीड लाखाचा ऐवज लूटला.
मागच्या आठवड्यात अशाच प्रकारे लूटण्याच्या पाच घटना दोन दिवसात घडल्या होत्या. त्यात कोंढव्यात चार तर सहकारनगरमध्ये एक घटना घडली होती. यासर्व घटनात मिळून चोरट्यांनी दीड लाखांची कमाई केली होती. या सर्व घटनांमध्ये एकटे चाललेले ज्येष्ठ नागरीक बघून तसेच त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून लूटण्यात आले आहे. इतक्या घटना घडूनही पोलिस नागरीकांनाच सावधानचेचे आवाहन करत आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या