

पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) - पुण्यातील लक्ष्मी रोडवरील साड्या व कपड्यांच्या दुकानांची रोजची विक्री हजार लाखांच्या घरात असते. पण असे असूनही या दुकानांच्या मालकांना किरकोळ हजार रूपयांच्या जकात चोरीचा मोह आवरत नाही. अशाच प्रसिद्ध वामा कलेक्शन या साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकान मालकाने बिलाची रक्कम कमी दाखवून केलेली जकात चोरी त्यांना 51 हजार रूपयांना पडली.
वामामध्ये राजस्थानच्या कोटा शहरातील रंगोली डिझाइन्स प्रा. लि. या कंपनीतून
जरीचे काम केलेल्या 21 साड्या मागवण्यात आल्या. या साड्या खाजगी कुरीयर मार्फत
मागवण्यात आल्या होत्या. त्या आव्हर नाइट कुरीयरने बिल दाखवून त्यावर 496
रूपये जकात भरली. त्या बिलात साड्यांची किंमत अवघी 19 हजार रूपये दाखवण्यात
आली होती.
याचा संशय आल्याने जकात निरीक्षक रवींद्र व-हाडे व कमलेश प्रधान यांनी या
कुरीयरवाल्याला ब्रेमेन चाैकात आडवले. त्याच्याकडील कागदांची तपासणी केली. त्यात
साड्यांची किंमत 5 ते 19 हजार अशी वेगवेगळी असल्याचे अढळून आले. या सर्व
साड्यांची किंमत एकूण 2 लाख पाच हजार रूपये आहे. त्यांनी किंमत कमी दाखवून
जकात चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना जकातीची पूर्ण रक्कम व त्यावर अकरा पट दंड
असे एकूण 51 हजार रूपये भरण्यास सांगितले.
ही रक्कम त्यांनी निमूटपणे भरली. यापूर्वीही वामा कलेक्शनने जकात चारी केली
होती. त्या बद्दल त्यांना 25 हजार रूपये दंड भरण्यास सांगण्यात आले आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या