

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) - पुण्यातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्स या पेढीने साडेसहा
लाखांचे हि-यांचे दागिने मागवले होते. या दागिन्यांवर जकात होती फक्त 18 हजार
रूपये पण ती चुकवण्याचा प्रयत्न केल्याने पुणे महापालिकेच्या जकात विभागाच्या फ्लाइंग
स्कॅाडने रंगेहाथ पकडले. त्यावर रांका ज्वेलर्स यांना नोटिस बजावण्यात आली आहे.
ही घटना दोन सप्टेंबरला लक्ष्मी रोडवरील रांकाच्या दुकानाच्या बाहेर घडली. त्या दिवशी
जकात चुकवून माल आणण्यात येणार आहे अशी टीप या स्कॅाडला मिळाली होती.
त्यानुसार हे पथक तिथे थांबले होते. दुपारच्या सुमारास प्रवीण जैन या हा अंगडिया
रिक्षेतून उतरताच त्याला पथकाने घेरले त्याच्या जवळ्याच्या मालाची तपासणी केली.
त्यात हि-यांच्या पाच बांगड्या सापडल्या. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
अंगडियाला जकात खात्याच्या कार्यालयात आणण्यात आले. तोपर्यंत हा माल रांका
ज्वेलर्ससाठी आणला असल्याचेही तो नाकारत होता. त्यामुळे त्याची कसून तपासणी
करण्यात आली. त्यात या बांगड्यांचे बील मिळाले. ते मुंबईतील दादरच्या फर्स्ट
डिव्हिनिटी कंपनीचे होते. तसेच ते शैलेश रांका यांच्या नावावर असल्याचेही उघड झाले.
या बीलावर मालाची रक्कम सहा लाख पन्नास हजार दाखवण्यात आली होती. दरम्यान
रांका ज्वेलर्समधून हा माल बाहेरून आणला नसून तो त्यांच्याच कर्वेरोडवरील दुकानातून
आणला असल्याचा फोन जकात प्रमुख राजेंद्र मुठे यांना आला.
जकात प्रमुख मुठे यांनी रांका ज्वलर्सला नोटिस बजावली आहे. त्यात त्यांना जकातीची
रक्कम 19500 रूपये आणि अकरापट दंड असे 2 लाख पाच हजार रूपये भरण्यास
सांगण्यात आले आहे. ही रक्कम त्यांनी न भरल्यास त्यांच्यावर फैाजदारी दावा करण्यात
येणार असल्याचे मुठे यांनी पत्रकारांना सांगितले.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या