

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) - पुणे शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. त्यात सर्वच पक्षांचे राजकीय कार्यकर्ते गुंतले आहेत.महापालिकेतही नवा गडी नवा राज सुरू झाले आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे पहिल्यांदा बेकायदा बांधकांमाविरूद्ध जोरदार मोहीम उघडली असून छोटी बांधकामे पाडण्यात येत आहेत. मात्र मोठ्या बांधकांमांना हात घालण्याचे धाडस अद्याप दाखवलेले नाही.
गेले काही दिवस महापालिकेच्या अतिक्रणम तसेच बेकायदा बांधकाम विरोधी पथकांनी हजारो चैार फूटांची बेकायदा बांधकामे जमीन दोस्त केली. त्यात शहराच्या उपनगरातील बांधकांमांची संख्या जास्त आहे. ही बांधकामे जेसीपी लावून तोडण्यात येत आहेत. तसेच रस्त्यावर बसणा-या विनापरवना पथारीवाल्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेत आय़ुक्त नव्याने रूजू झाले की ते अशा बेकायदा बांधकांमांविरूद्ध मोहीम उघडतात.आतापर्यंत आलेल्या आयुक्तांमध्ये फक्त अरूण भाटिया यांनीच मोठ्यांच्याही बेकायदा बांधकांमांवर जेसीपी चालवले होते. पंचतारांकीत हॅाटेलपासून ते खासदार कलमाडींच्या पूना कॅाफी हाऊसपर्यंत सर्वच बांधकामांवर त्यांनी हातोडा चालवला होता.त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावरील सर्वच बेकायदा बांधकामे या मोहिमेत पाडण्यात आली. त्यामुळे अर्थातच काहीच दिवसात भाटियांची बदली झाली.
भाटियांनंतर काही आयु्क्त आले आणि गेले. पण अशा प्रकारे कारवाई करण्याचे धाडस कोणीही दाखवू शकले नाही. आता काहीच महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या डॅा. महेश झगडे यांनीही अशा प्रकारची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा पुरवली आहे. ही यंत्रणा सध्या रोज लहान लहान बांधकांमांवर कारवाई करत आहे. ही बेकायदा बांधकामे झाली त्यावेळी दुर्लक्ष करणा-यांवर काय कारवाई करणार याबद्दल सगळेच गप्प आहेत.
बेकायदा बांधकामे तसेच रस्त्यावर विनापरवाना व्यवसाय करणा-यांवर काडक कारवाई करण्याचा कायदा सरकारने केला. त्याच कायद्यात अशा बेकायदा बांधकाने किंवा पथारीवाल्यांना बसू दिल्याबद्दल संबंधित अधिका-यांना जबाबदार धऱणे तसेच त्या परिसराच्या पोलिस अधिका-याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण दुर्दैवाने त्याचा वापर अद्याप कोणी केलेला नाही.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या