Skip to content
जाहिरात

पुण्याच्या भाजपच्या प्राध्यापक मठकरी यांची पश्चात बुद्धी

October 15, 2009

पुणे, दि. 15 (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर त्यात
गैपरप्रकार झाल्याची आवई प्रा. विकास मटकरी यांनी पत्रकारांसमोर उठवली असून मात्र त्याकडे साफ दुलर्क्ष केले आहे. त्यामुळे त्या आरोपातील हवाच गेली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. त्यात शिवाजीनगर
मतदारसंघातील काही केंद्रांवर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान चालले होते.हे सगळे
बोगस मतदान असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार प्रा. विकास मटकरी यांनी त्यानंतर
चोवीस तासांनी म्हणजे बुधवारी दुपारी केला. त्यावेळी त्यांनी अन्य उमेदवारांना बरोबर
ठेवण्याचे भान राखले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर दोन हजार एकोणसाठ जणांनी
केलेले मतदान बोगस आहे व ते मसल पाॅवरवर करून घेण्यात आले असा त्यांचा आरोप
आहे.
मतदानाची वेळ संपल्यावर शिवाजीनगर मतदारसंघात काही ठिकाणी मोठ्या रांगा
असल्याची बातमी अर्ध्या तासात पुण्यात पसरली होती. मात्र त्यावेळी मटकरी यांच्यासह
अन्य उमेदवारांचे प्रतिनिधी त्या केंद्रांवर हजर का नव्हते ? प्रा. मटकरी यांनी त्याच
दिवशी तक्रार का नोंदवली नाही ? इकडे मतदान होत असताना ते कुठे होते ? अशा
काही शंका त्यांची आज बातमी वाचल्यावर सूज्ञ मतदारांनी उपस्थित केल्या आहेत.
या वेळी प्रचारात मठकरी हे साफ मागे पडले. इतकेच काय तर त्यांना कार्यकर्तेही काम
करण्यासाठी मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव स्पर्धेतून मागे पडल्याने काही ना काही
आरोप करण्याची संधी ते शेवटचे काही दिवस शोधत होते. त्यांना काँग्रेसचे उमेदवार
विनायक निम्हण यांच्या विरोधात लढण्यासाठी काहीच मुद्दे नव्हते असे त्यांच्या प्रचारा
दरम्यान दिसून आले, त्यामुळे ते काही तरी करून निवडणुकीत दहशतवाद आणण्याचा
प्रय़त्न करत होते. तसा प्रय़त्न त्यांनी सुरूवातीला केलाही पण तो फार काळ उपयोगात
आला नाही त्यामुळे आता त्यांनी ही बोगस मतदानाची आवई उठवली आहे.
बोगस मतदान झाल्यासंदर्भातील मठकरी यांची बातमी वाचून सूज्ञ मतदारांनी याचे वर्णन
पश्चात बुद्धी असे केले आहे. कारण मतदान हे गुप्त असते तर ते मठकरींना कसे कळले
की बोगस आहे म्हणून !ज्यावेळी हे मतदान चालले होते त्यावेळी मठकरी तेथे असते व
त्यांनी उमेदवार म्हणून आक्षेप घेतला असता तर त्यात काही तथ्य आहे असे वाटले
असते. पण त्यांनी आक्षेप मतदानाची वेळ संपल्यानंतर दुस-या दिवशी घेतला.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.