

पुणे, (प्रतिनिधी) - पहाटेच्यावेळी दोघा तरूणांना हटकणा-या पोलिसांना त्यांच्याच सहका-यांनी तरूणांना तक्रार द्यायला लावून लूटमारीच्या गुन्ह्यात अडकवले होते. पण त्या दोघा पोलिसांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
तरूणांना हटकल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. यातील आनंद कृष्णाजी आयचित व रामदास निवृत्ती गद्रे हे दोघे फरासखाना पोलिस ठाण्यात कामाला होता. त्या दिवशी पहाटे त्यांनी अभिषेक महाराणाप्रतापसिंह चौहान व त्याचा मित्र अविनाश बबनकुमार सिंग यांना अडवले. तसेच मुलीच्या घरी रात्रभर राहुन आल्याबद्दल कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यानी मुलांच्या एटीएममधून तीन हजार रूपये काढून घेतल्याची तक्रार अभिषेक व त्याच्या मित्राने दिली होती. या सर्व प्रकरणात एक रिक्षा चालक होता तो अद्याप फरारी आहे.
यात आय़चित व गद्रे यांची बाजू मांडताना त्याचे वकील रोहित तुळपुळे यांनी न्यायालायात सांगितले की ते दिवस डिंसेंबरमधील म्हणजे थंडीचे होते. आरोपींनी माकड टोपी व स्वेटर घातला होता.वेळ पहाटेची असल्याने अंधार होता त्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकलेले नाही. तसेच या प्रकरणातील बहुतेक सर्व पुरावे फरारी रिक्षा चालकाविरूद्ध आहेत.
ज्या एटीएममधून पैसे काढले तेथील कॅमे-यात त्या रिक्षा चालकाचा फोटो आला असून फोटो असूनही त्याला अद्याप अटक झालेली नाही. यातील घटनाक्रम व तक्रार परस्परांशी जुळत नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या फिर्यादित करण्यात आलेले लूटमार, खंडणीचे प्रत्यक्ष आरोप या दोन आरोपींवर नसून फक्त त्या रिक्षा चालकावर करण्यात आलेले आहेत. तुळपुळे यांचा हा युक्तीवाद मान्यकरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आ. म. सामंत यांनी आय़चित व गद्रे यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. तसेच त्या फरारी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर स्वतंत्र आरोपपत्र दाखल करावे असेही याच आदेशात नमूद केले आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या