

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तशीच पुण्यातील वाहनांची संख्याही वाढत असून वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. रोज सरासरी एक माणूस पुण्यात वाह्तुकीमुळे मरण पावतो, मात्र त्याकडे महापालिका गांभिर्याने बघत नसल्याचे उड्डाणपूल व भुयारी मार्गांच्या प्रकल्पावरून सिद्ध झाले आहे.
पुणे महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात सुमारे 75 कोटी रूपयांची तरतूद उड्डाणपूल व भुयारी मार्गांसाठी करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकही प्रकल्प अद्याप कागदावर आलेला नाही. या वर्षातील पहिले आठ महिने पूर्ण होत आले आहेत. पुढील महिन्यात म्हणजे डिसंबरमध्ये पुढील वर्षाच्या (सन 10-11) अर्थसंकल्पाचे काम सुरू होईल मात्र चालू अर्थसंकल्पातील प्रकल्पांचे कच्चे आऱाखडे किंवा इस्टमेटसही तयार झालेली नाहीत.
ही बाब माजी विरोधी पक्षनेते विकास मठकरी यांनी उघडकीस आणली आहे. त्यांनी दिलेल्या महितीनुसार शहराच्या वेगवेगळ्या भागात पूल, उड्डाण पूल व भुयारी मार्गांची एकूण 27 कामे सुचवण्यात आली होती. त्या प्रत्येक कामासाठी मिळून एकूण 75 कोटी 50 लाख रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत यापैकी एक नवा पैसाही खर्ची पडलेला नाही.
या सर्व कामांसाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. त्यांना प्रकल्पाच्या खर्चाच्या तीन टक्के फी दे्ण्यात येणार आहे. मात्र या सल्लागारांकडून अद्याप साधे डिझाइनही महापालिका प्रशासन करून घेऊ शकलेले नाही. ज्या एकदोन प्रकल्पांची डिझाइन्स देण्यात आली होती त्यात चारपाच वेळा फक्त दुरूस्त्या सूचवण्याचे काम अधिका-यांनी केले आहे असे मठकरी सांगतात.
एसएनडीटी ते बालभारती उड्डाण पूल, प्रभात रोड, भांडारकर रोड, शनिपार, आप्पाबळवंत चौक, कर्वेनगर, नळस्टॉप चौक, पानमळा, पर्वती दर्शन, वानवडी अशी प्रचंड वाहतूक असलेल्या चौकात हे प्रकल्प सूचवणयात आले आहेत. मात्र महापालेका प्रशासनाला या सर्व परिसरातील वाहतुकीचे गांभिर्य नाही हेच त्यांच्या कामावरून सिद्ध होते. यावेळी निवडणुकांमुळे प्रशासनाला अशी कामे करण्यासाठी भरपूर वेळ होता. आचारसंहितेमुळे त्यांच्या मागे नगरसेवक किंवा नागरीकांचा ससेमीरा नव्हता. पण हा वेळ आचारसंहितेचेच कारण देऊन प्रशासनाने वाय घालवला आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या