Skip to content
जाहिरात

ठाणे नंतर पुण्यात कच-यापासून बायोगॅस वीजनिर्मीती प्रकल्प

November 13, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - ठाणे शहरातील हिरानंदानी कॉन्प्लेक्समध्ये बायोगॅसपासून वीज निर्मीताचा प्रॅकल्प यशस्वी केल्यानंतर पु्ण्याच्या मॉडेल कॉलनीच असा प्रकल्प नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांनी पुढाकार घेऊन उभा केला आहे. पुण्यातील इन्प्रोटेक सोल्युशन्स या कंपनीने हा प्रकल्प उभा केला आहे. महापालिका व नगरपालिकांना भेडसावणारी कर-याच्या समस्येवर हा एक चांगली उपाय ठरू शकतो.

या कंपनीने ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी या 12000 फ्लॅटसच्या संकूलात असाच ओल्या कर-यापासून बायोगॅस तयार करून त्याव्दावे वीज निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. हा प्रकल्प गेली पाच वर्षे सुरू आहे. त्याव्दारे तयार होणा-या वीजेवर त्या संकूलातील तीन पाण्याचे पंप रोज चालतात. या पंपासाठी त्यांना दोनशे युनिट वीज रोज साडेसात रूपये प्रती युनिट दराने घ्यावी लागत होती त्या पैशाची बचत झाली असून त्यातून सोसायटीने उद्याने विकासीत केले आहे.
मॉडेल क़ॉलनीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात रोज पाच टन ओला कचरा लागणार असून त्यात तेवढेच पाणी मिसळून मिथेन गॅस तयार करण्यात येणार आहे. या मिथेन गॅसवर रोज दोनशे ते अडीचशे युनिच वीज निर्मिती होईल व त्यावर त्या परिसरातील रस्त्यावरील दिवे लावण्यात येणार आहेत. नविन वर्षात वीज निर्मिती सुरू होईल.
अशा प्रकारच्या प्रकल्पाचा दोन मुख्य प्रश्न असतात की त्यामुळे सुटणारी दुर्गंधी व माशाचा प्रार्दूभाव. पण त्या दोन्ही गोष्टी कशा टाळता येतील अशाच प्रकारचे प्रकल्पाचे डिझाइन तयार करण्यात आले असून केवळ 500 चौरसमीटर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी नगरसेविका सरदेशपांडे यांनी कॉलनीतील संस्थांच्या कार्यकर्त्यांना व महापालिकेच्या अधिका-यांना घेऊन हिरानंदानी काम्प्लेक्समधील प्रकल्प बघून आल्या.
पहाणी दौ-यानंतर एक वर्ष केवळ महापालिकेत कागदी घोडे तयार करून नाचवण्यासाठी लागले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात प्रकल्प उभा राहिला आहे. त्यात गॅस निर्मीती सुरू झाली आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने केलेला 48 लाखांचा खर्च पुढील चार वर्षात वीज बील बचतीतून भरून निघणार आहे. रोज प्रती युनिट साडेचार रूपये दराने रोजचे दोनशे युनिटचे पैसे वाचणार आहेत.
ही कंपनी पुण्याची असून त्यांनी सर्वात अगोदर प्रकल्प ठाणे शहरात नंतर सावंतवाडी, जयसिंगपूर, चिपळूण, अशा नगरपालिकांसाठी केले आहेत. आता या मॉडेल कॉलनीतील प्रकल्पाची प्रगती पाहून त्यांना हडपसर, बाणेर अशा दहा ठिकाणी जागा महापालिकेने देऊ केल्या आहेत. हे सर्व प्रकल्प पहिली पाच वर्षे इन्प्रोटेक कंपनीच चालवते त्यासाठीचा खर्च महापालिका करणार आहे.
ठाणे महापालिकेसाठी 15 टनाचा प्रकल्प ठाणे महापालिकेने कच-यापासून वीज निर्मीती करणारा प्रकल्प उभा केला होता, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे त्या प्रकल्पाचे काम करून तो सुरू करण्याची तयारी इन्प्रोटेकने दाखवली. काही महिन्यात या बंद पडलेल्या प्रकल्पात अधुनिक तंत्रज्ञान आणून कंपनीने हा प्रतीदिन पंधरा टन क्षमतेचा प्रकल्प सुरू केला आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.