

पुणे, (प्रतिनिधी) - प्रशासन म्हणजे त्यातील अधिकारी हे लोकप्रतिनिधींना कसे
नाचवतात याचे उदाहरण आज घडले. पुणे महापालिका हद्दीत 37 गावे समाविष्ट
करण्याबाबता अनुकूल अभिप्राय ज्या प्रशासनाने दिला होता त्यांनीच पुन्हा त्यावरच नव्याने
अभिप्राय देतो असे सांगत विषय मारून टाकला.
पुणे महापालिका हद्दी लगतची 37 गावे महापालिकेत समाविष्ट करावी असा प्रस्ताव दीड
वर्षांपूर्वी पक्षनेत्यांसमोर आला होता. त्यावेळी बैठकीत प्रशासनाचा अभिप्राय घेण्याचा
निर्णय झाला होता. त्यानुसार प्रशासनाने गावे समाविष्ट करण्याबाबात अनुकूल अभिप्राय
दिला होता.
त्यानंतर मात्र गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पक्षनेत्या समोर पडून होता. पुणे
महापालिकेतील पक्षनेत्यांची बैठक आज महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी बोलावली होती.
त्या बैठकीत नगरसेवक उज्वल केसकर यांनी महापौरांच्या परवानगीने हा विषय काढला.
त्यामुळे गावे समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. अखेर या प्रस्तावावर पुन्हा
प्रशासनाचा नव्याने अभिप्राय घेऊन तो विषय आणण्याचे महापौरांनी जाहीर केले.त्यामुळे
आता प्रशासनावर आपल्याच अभिप्रायावर पुन्हा एकदा अभिप्राय देण्याची वेळ आली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या