Skip to content
जाहिरात

पोलिस आय़ुक्तालयात कार्यक्रम अधिकारी, शिपायांना कामाला जुंपले

November 21, 2009

पुणे, (प्रतिनिधी)- घरी काही मंगल कार्य असो वा कोणताही कार्यक्रम असला की सारं कुटुंब कामाला लागते. पण बाहेरच्या कार्यक्रमासाठी अनेकवेळा कंत्राट देतात. असे असले तरी पोलिस आयुक्तालयातील कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी विशेष शाखेच्या अधिका-यांपासून ते शिपायांपर्यंत सर्वांनाच कामाला जुंपल्याने अधिकारी झाले होते मुकादम अन शिपाई झाले होते गडी.

पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे नुतनीकरण कऱण्यात आले असून सगळ चकाचक करण्यात आले आहे. येथून पासपोर्ट, व्हीसाच्या कामांसाठी परदेशी नागरीक येतात. तसेच राजकीय गुप्त वार्ता विभागही येथेच आहे. खरातर इतके दिवस या विशेष शाखेत पासपोर्ट सारखा महत्वाचा विभाग टेबल स्पेसवर जागा घेतल्यासारखा होता. पण आता केवळ फर्निचरच नव्हेतर अधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर येथे केला जाणार आहे. विशेष शाखेच्या या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याहस्ते होणार असून त्या कार्यक्रमाला गृहमंत्र्यांपासून अनेक मान्यवर येणार आहेत. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयात आज नेहमीची कामे सोडून पोलिस सुशोभिकरण आणि त्या अनुषंगाने करायवयाची कामे करण्यात मग्न होते.
पडदे लावणे, रेड कार्पेट टाकणे, रंगरंगोटी, पुलझाडांच्या कुंड्यांची मांडामांड अशी वेगवेगळी कामे आज विशेष शाखेचे पोलिस शिपाई कऱते होते आणि त्याच शाखेचे निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्यावर मुकादमासारखे त्यांच्याकडून कामे करून घेत होते.एरवी साध्या पोलिस चौकीमध्ये कार्यक्रम असला तरी त्या परिसरातील लोकांकडून कामे करून घेताना पोलिस दिसतात. यावेळी खुद्द पुणे आय़ुक्तालयातच कार्यक्रम असूनही ठेकेदाराऐवजी त्यांच्याकडचे अधिकारी व शिपाई राबत होते.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.