

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शहराचा विस्तार जसा होत आहे तशी लोकसंख्याही वाढत असून वाहनांची संख्या वाढण्याचा वेग त्यापेक्षा जास्त आहे. आजमितीला शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 35 लाख असून वाहनांची संख्या 24 लाख आहे. त्यामुळे अठरा वर्षाखालील मुलांची संख्या कमी केली तर प्रत्येक व्यक्तीमागे आज पुण्यात एक वाहन आहेच.
सन 2001 च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या 25 लाख होती. गेल्या काही वर्षात पुणे आणि परिसरातील रोजगारांची निर्मीती वाढली त्यामुळे पुणे शहराची लोकसंख्याही वाढत आहे. त्याच बरोबर पुण्यात वाहनांची संख्याही वाढत असून वाहतुकीचा सरासरी वेग ताशी वीस किलोमीटर आहे. दरवर्षी त्यात घट होत आहे.
पुण्यातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची प्रक्रीया सुरू असली तरी त्यापैकी अनेक योजना सुरू झाल्यनंतर निरूपयोगी असल्याचे लक्षात य़ेते. अशाच योजनांपैकी एक म्हणजे ट्रॅफिक कॉर्प होय. या योजनेचा प्रारंभ काल उर्जामंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला. त्या कार्यक्रमात त्यांनीच वाहन संख्येची महिती दिली.
पुणे शहरात सध्या 24 लाख वाहने आहेत.त्यात दुचाकींची संख्या 17 लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. पुण्याच्या रस्त्यांवर रोज सरासरी 600 ते 700 वाहनांची भर पडते असे पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच म्हटले आहे.
पुणे शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी अठरा वर्षाखालील मुलांची संख्या (वाहन परवाना मिळण्यासाठी किमान वय 18 वर्षे लागते) तीस टक्के धऱल्यास आज पुण्यात प्रत्येक व्यक्तीमागे एक वाहन असे प्रमाण आहे. त्यात रोज नवनविन भर पडत आहे. शहरात आज एकूण एक हजार पाचशे चौक आहेत. तेवढे पोलिस नसल्याने मदतीसाठी देण्यात आलेल्या ट्रॅफिक वॉर्डनचा पगार पुणे महापालिका देत आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या