Skip to content
जाहिरात

कोथिंबीर जुडी 20 रूपये, काकडी 40 रूपये

November 23, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - मागिल आठवड्यात झालेल्या आवकाळी पावसाने केवळ पीकेच हातची गेली नाहीत तर भाज्यांही नेल्या आहेत. त्यामुळे वीकेन्र्ड्ला पुण्यातील मंडईत भाज्यांची आवक कमी झाल्याने दर कडाडले. त्यात कोथिंबिरीची एक जुडी 20 रूपयांना तर काकडी चक्क 40 रूपये किलो दराने विकली जात होती.

कांद्याने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात खरेदी न करताच पाणी आणले आहे. जुना कांदा तीस रूपये किलो दराने विकण्यात येत होता. मंडईत नव्या कमी प्रतीच्या हळव्या कांदा आला खरा पण त्याला मागणी नसल्याने त्याची विक्री बारा ते पंधऱा रूपये किलो दराने होत होती. करपा रोगामुळे कांद्याची मोठी हानी झाली आहे. त्यात वादळी वा-यासह पाऊस पडल्याने पावसाळी हळवा कांद्याचेही उत्पादन घटले आहे.
मंडईत परराज्यातून आलेल्या घेवड्याला जास्त भाव नव्हता पण आपल्या स्थानिक शेतातून आलेल्या घेव़डा साठ रूपये किलो दराने विकला जात होता. शेतक-यांनी दिलेल्या महिती नुसार पाऊस दोन टप्प्यात झाला त्यामुळे पीकांची जास्त नुकसानी झाली आहे. त्यामुळे या भाज्यांचेही नुकसान झाल्याने भाव कडक आहेत.
तोडली सुमारे पंचवीस रूपये किलो दराने विकली जात असताना मटार मात्र अद्याप 70 रूपये किलो दरानेच विकला जात आहे. या तुलने फ्लॉवर, कोबी अगदीच स्वस्त असून त्यांची किरकोळ विक्री पाच ते दहा रूपये दराने झाली.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.