

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असणा-यांच्या मिळकतींना सील ठोकायला सुरूवात केली आहे. पुणे शहरातील मिळकत कराची थकबाकी सुमारे दोनशे कोटी रूपये आहे.
पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या अधिका-यांनी कोंढवा येथील इस्टिट्यूट ऑफ इन्फर्नेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड मेनेजमेंट या संस्थेला सील ठोकले. त्यांच्याकडे 7.30 लाख रूपये थकबाकी आहे. त्याच बरोबर वानवडीच्या विशाल मेगा मार्टमधील शाहीद इंडस्ट्रीजकडे 2 लाखाची थकबाकी असून त्यालाही सील ठोकण्यात आले.
याच परिसरातील वानवडीच्या क्रोम प्लॅनेट इंटरर्स प्रालि. या कंपनीकडे 31.35 लाखांची थकबाकी होती. ती वसूल करण्यासाठी कर आकारणी कर संकलन विभागाचे सहप्रमुख कडलक वैभव व त्यांचे सहकारी गेले असता वसुली करू नये यासाठी दिल्लीहून फोन करण्यात आले. तरीही या विभागाचे प्रमुख विलास कानडे व कडलक ठाम राहिले. त्यामुळे अखेर या कंपनीने थकबाकीच्या रकमेचे चेक अधिका-यांकडे सुपूर्त केले.
मिळकत कराच्या थकबाकी बद्दल महिती देताना कानडे यांनी सांगितले की, शहरातील एकूण मिळकतींची वाद अन कोर्ट मॅटरसह थकबाकी दोनशे कोटी रूपये आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील महिती अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने त्याची नक्की महिती काही दिवसांनी समोर येईल. त्याच भागातील अन्य काही मिळकत दारांकडून आठ लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
मिळकत कर भरण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीत ज्यांनी कर भरलेला नाही अशा तीन लाख करदात्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. त्यांना रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर कर न भरणा-यांना वॉरंट काढण्यात येणार आहेत. गेल्याच आठवड्यात साखर आय़ुक्तायलयाची असलेली 1 कोटी 15 लाखांची थकबाकी वसुल करण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या