

पुणे, (प्रतिनिधी)- पुणे महापालिकेने शहरातील मिळकत कर थकवणा-यांना नोटिसा काढल्या आहेत. मात्र त्याचवेळी गेली सात वर्षे कर न भरणा-यां मोबाइल कंपन्यांकडे कानाडोळा केला आहे. पुणे शहरातील पाच मोबाइल कंपन्यांकडे 136 कोटींची करांची थकबाकी असल्याने अशा मोठ्या कंपन्यांना पकडा असे आदेशच महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शहरात रिलायन्स, टाटा इंडिकॉम, अय़डिया, वडाफोन आणि एअर टेल या पाच कंपन्यांनी त्यांचे जाळे गेल्या काही वर्षात तयार केले आहे. या कंपन्या ग्राहकांसाठी योजना काढतात. जो ग्राहक बील भऱणार नाही त्याचा फोन बंद करून टाकतात किंवा काहीवेळेस बील भरूनही फोन बंद करून टाकतात.
या मोबाइल कंपन्यांची मोठी मोठी कार्यालये पुण्यात आहेत. या शिवाय त्यांनी ट़ॉवर्स उभे केले आहेत. असे एकूण 598 टॉवर्स शहरात असून त्यापैकी दोनशे टॉवर्स बेकायदा आहेत. तसेच त्यांनी पुण्यातील रस्ते खोदून केबल्सही टाकल्या आहेत.
कंपनीच्या मिळकतीचा कर त्यांनी भरणे अपेक्षित आहेत. तसेच केबल टाकण्यासाठी पुणे महापालिकेने ठरवलेले शुल्क भरणे व भुईभाडे भऱणे अपेक्षित आहे. पण या कंपन्यांनी सन 2002 पासून कोणताही कर अगर शुल्क अगर भाडे भरलेले नाही अशी बाबा उघड झाली आहे.
पुणे महापालिकेने दोनच दिवसांपूर्वी रिलायन्स कंपनीवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. त्यात अन्य कंपन्या आयडिया, वडाफोन, टाटा, एअरटेलही तितक्याच दोषी आहेत. या सर्व कंपन्यांकडे एकूण थकबाकी 136 कोटी रूपयांची आहे. प्रशासनाने मिळकत कराची थकबाकी असणा-यांविरूद्ध मोहीम सुरू केली असून या मिळकतींना सील ठोकण्यापर्यंत कारवाई सुरू केली आहे. तसेच सुमारे तीन लाख जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. या छोट्या लोकांना अशा प्रकारे छळण्यापूर्वी मोठ्या कंपन्यांकडे वसुली करा असे आदेशच महापौर भोसले यांनी दिले आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या