Skip to content
जाहिरात

टीडीआर घोटाळ्यातील आरोपींची नगरसेवक घेणार सुनावणी

November 25, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्यातील कोथरूड परिसरातील मोठा टीडीआरचा घोटाळा काही
वर्षांपूर्वी उघकीस आला आहे. त्यातील सहा आरोपी पुणे महापालिकेचे कर्मचारी असून
त्यातील तांबारे वगळता अन्य पाच आरोपींची सुनावणी आता नगरसेवक सर्वसाधारण सभेत
घेणार आहेत.

या घोटाळ्यातील दत्तात्रय तांबारे, दीपक कुलकर्णी, मधुसुदन येनकर, माजी विधी सल्लागार रवींद्र थोरात, सीताराम महू आणि चंद्रसेन नागटिळक यांच्यावर अभियोग चालववा का अशी विचारणा उच्चन्यायालायाने महापालिकेकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात निर्णय द्यावा असेही सांगण्यात आले आहे. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन तांबारे यांच्यावर अभियोग चालवण्यास परवानगी द्यावी आणि अन्य कर्मचा-यांची खाते निहाय चौकशी करून त्यांना शिक्षा द्यावी अशी शिफारस करून तो ठराव मुख्य सभेकडे पाठवण्यात आला होता.
त्यावर सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. अखेर तांबारे वगळता अन्य पाच जणांना त्यांची बाजू मांडण्यास संधी द्यावी. त्यांनी त्यांचे म्हणणे दोन डिसेंबरपर्यंत लेखी स्वरूपात द्यावे आणि तीन डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी त्यांची बाजू मांडावी असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दि.3ला होणा-या सर्वसाधारण सभेत त्यांची सुनावणी नगरसेवक घेतील आणि त्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
एसआरएतील टीडीआर घोटाळा
दरम्यान, या निर्णयाच्या चोवीस तास अगोदर म्हणजे कालच्या सर्वसाधारण सभेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झालेल्या टीडीआर घोटाळ्याची प्रकरणे बाहेर आली. पुण्यात कोथरूड टीडीआर प्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू असतानाच हे दुसरेच मोठे प्रकरण बाहेर आल्याने पुण्यात अशा प्रकारे टीडीआर घोटाळा करणा-यांवर कोणाचाच वचक नसल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंत उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील कोणालाही अद्याप शिक्षा झालेली नाही. उलट अधिकारी टीडीआर न देता बाजारात त्याचे शॉर्टेज करून भाव वाढवून देत आहेत. यात बिल्डर्सचे उखळ पांढऱे होत आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.