Skip to content
जाहिरात

ट्रॅफिककॉप ब्लॅकबेरीने पंधरा मिनिटात गुन्हेगार पकडून दिले

November 25, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्यातील वाहतुकीवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक क़ॉप योजना सुरू केली आहे. यात ब्लॅकबेरी हॅण्ड़सेटच्या सहाय्याने गुन्हेगारांना शोधण्यात
येणार असून पहिल्या गुन्ह्यातील आरोपीना अवघ्या पंधरा मिनिटात पोलिसांनी चतुर्भुज
केल्याची घटना हडपसरला घडली आहे.

हडपसर-मुंढवा रोडवर ही घटना घडली. रात्री मुढव्याकडून ट्रक येत होता तर दोन तरूण मोटारीतून मुंढव्याच्या दिशेने चालले होते. त्यांची मोटार रस्त्याच्या मधोमध असल्याने ट्रक चालक महेश सोमनाथ शिंदे याने लाइट कमीजास्त करून सिग्नल दिला, पण मोटार चालकाना गाडी बाजूला घेण्याऐवजी ट्रकच्या समोर आणून उभी केली.
इतकेच नाही तर त्यांनी शिंदे याला खाली उतरवून मारहाण केली आणि ते निघून गेले.
त्यानंतर शिंदे यांनी हडपसरमध्ये य़ेऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तेव्हा तेथील
अधिकारी मांढरे हे गस्तीसाठी बाहेर पडत होते. त्यांनी फिर्यादीचे म्हणणे ऐकले आणि
त्याने दिलेला मोटारीचा नंबर वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळवून मोटारीची महिती
विचारली.
हा कॉल वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी ऐकाला आणि त्या मोटारीचा नंबर
ब्लॅकबेरीवर टाकला. काही क्षणात त्यांना गाडीच्या मालकाचे नाव, पत्ता व इथर महिती
समजली. ती त्यांना लगोलग मांढरे यांना कळवली. त्यानंतर मांढरे यांनी मुढव्यात
जाऊन त्या मोटारीचा शोध घेतला तर त्यांना ती मोटार मुंढव्यातील घरासमोर सापडली
आणि त्यातील दोघेजण तिथेच मिळाले.
मोटार चालक संजय गायकवाड व नारायण मोरे यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारू पियून गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाले
आहे. त्यामुळे त्यांच्यावर मारहाण व दारू पिवून गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या शिवाय पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या सुमारे एक हजार
जणांना पकडून त्यांच्याकडून पावणे दोन लाख रूपये दंड वसूल केला आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.