Skip to content
जाहिरात

मोठ्या व्यक्तींना तुरूंगवास किंवा भ्रष्टाचाराचे आरोप

November 29, 2009

पुणे - दि. 2 डिसंबरच्या पौर्णिमांन्त कुंडलीमध्ये लग्न उदित असून चतुर्थ स्थानातून
पौर्णिमा होत आहे. या शिवाय षष्ठ स्थानी मंगळ, अष्टमस्थानी शनि, लाभस्थानी
राहू, प्लूटो व बाराव्या स्थानी गुरू नेपच्यून युती होत आहे. या युतीशी मंगळाचा
प्रतियोग होत आहे. तसेच हर्षल-मंगळाचा षडाष्टक योग होणार आहे. त्यामुळे मोठ्या व्यक्तींना तुरूंगवास किंवा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची शक्यता ज्योतिर्विद सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवली आहे.

- मोठ्या व्यक्तींना तुरूंगवास किंवा भ्रष्टाचाराचे आरोप,- विमान दुर्घटना, त्सुनामी
किंवा वादळांमुळे हानी, - उन-पावसाचा खेळ मार्चपर्यंत सुरू रहाणार, - हवामानात
विचित्र बदल: थंडीची शक्यता कमी, - भारतीय खेळाडू, कलाकरांना प्रतिकूल काळ
- शेअर मार्केटमध्ये मंदीची परिस्थिती.
लग्नस्थानातील हर्षल, जनमानसात अस्थिरता निर्माण करणारा असून काही
सामाजिक विषायांवर विसंवाद, हिंसा, तोडफोड, निदर्शने घ़डवण्यास पूरक रहाणार
आहे. हर्षलचा मंगळाशी झाल्यामुळे वादळे, पूर, सुनामी, विमान अपघात यासारख्या
घटनांमधून मोठी हानी संभवते. याशिवाय काही ठिकाणी अतिपेकी कारवाया होणयाची
शक्यता वाढते.
गुरू - नेपच्युन युती बाराव्या स्थानी होत असल्यामुळे काही प्रतिष्ठितीत व्यक्तींना भ्रष्टाचार
किंवा गुन्हेगारीच्या कारणांवरून शिक्षा किंवा तुरूंगवास संभवतो. मोठ्या व्यक्तींची बदनामी
संभवते. या शिवाय काही मंत्री किंवा राजकीय व्यक्तींवर आरोप होऊन मोठ्या प्रमाणावर
अफवा पसरवल्या जातील. याच योगामुळे हवेत विचित्र बदल होऊन अन्नधान्याचे मोठे
नुकसान होऊ शकते. या वर्षी थंडीचे पमाण कमी राहुनउन पावसाचा खेळ मार्चपर्यंत सूरू
राहिल. चतुर्थस्थानी रोहिणी नक्षत्रात होणारी पौर्णिमा अकाळी पडणा-या पावसासाठी
महत्वाची मानावी लागेल. याचा परिणाम विमान वाहतूक, हिवाळ्यातील पीके यांच्यासाठी पतिकूल रहाणार आहे. पौर्णिमेच्या जवळपास मोठ्या पावसाची शक्यता राहिल.
राजकीय क्षेत्रात सुद्धा मोठ्या नाट्यमय घटना घडणार असून राजकीय व्यक्तींचे घोटाळे
उघडकीस येतील. काही पक्षांमधेय तोढफोड होउन राजीनामा किंवा पक्षांतराच्या घटना
अनुभवास येतील. सत्ताधारी पक्षात सुद्धा मानापनाम किंवा नाराजीचे सूर स्पष्ट होतील.
सत्ताधारी पक्षातीन अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येतील. एकूण राजकीय क्षेत्रात गोंधळाची
परिस्थती निर्माण होइल.
शेअर बाजारात डिंसेंबरच्या पहिला पंधरवडा मंदीची परिस्थिती दिसते. काही महत्वाच्या
शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. नुकताच आपण श्रीलंकाला मोठ्या फरकाने
श्रीलंकेला हरवले असले तरी डिसंबरमध्ये कसोटीत मर्यादित यश भारतीय खेळाडूंना मिळेत. प्रमुख खेळांडूंकडून निराशा होईल. वृश्चिक राशीतील शुक्र भारतीय कलाकार, खेळाडूंना प्रतिकूल राहिल.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.