

पुणे, दि. 4 - पुणे महापिलिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला. स्थायी समितीचे
अध्यक्ष निलेश निकम यांनी एकूण 3192 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी जमाखर्चाचा ताळेबंद १६०० कोटींचा असल्याचे याच स्थायी समितीसमोर आय़ुक्तांनी
सांगितले आहे.
गेल्या काही वर्षात पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाने कोटींच्याकोटीची उड्डाणे करत तीन
हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. असे करताना अर्थ संकल्पातीत उत्पन्नाच्या
बाजूमध्ये मात्र कोणतिही वाढ केलेली नाही. जकात, सर्वसाधारण कर हीच उत्पन्नाची
मुख्य स्त्रोत आजही आहेत. त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्प तयार करताना गेल्यावर्षीच्या
जमेचे आकडे लक्षात घेतले जातात. पहिल्या नऊ महिन्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाच्या
आकड्यांवरून पुढील तीन महिन्यात किती उत्पन्न मिळेल याचा अंदाज काढला जातो.
यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आयुक्तांनी करवाढ सूचवताना महापालिकेची प्रत्यक्ष
जमा खर्चाची स्थिती सदस्यांपुढे मांडली होती. त्यानुसार यंदा म्हणजे 2009-10 या
वर्षात महापालिकेला एकून सोळाशे काटी रूपये उत्पन्न मिळणार असून त्यापैकी 662
कोटी रूपये कर्मचा-यांच्या पगारावर खर्च होणार आहेत असे स्थायी समितीच्या निदर्शनास
आणून दिले आहे. त्यानंतर आय़ुक्तांनी अर्थसंकल्प सादर करतानाही आर्थिक स्थितीबदंदल
चिंता व्यक्त केली होती.
गेल्या दोन वर्षात पुणे शहरात अनेक कामे झाली ती केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजने
अंतर्गत. त्याला केंद्राची मंजुरी आहे. त्याचे सुरूवातीचे पैसे राष्ट्रकूल स्पर्धांमुळे वेळेत
मिळाले पण त्यानंतर अनुदानाची रक्कम येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे पुणे
महापालिकेने जी कामे ठेकेदारांकडून अनुदानाच्या भरवशावर करून घेतली त्याची जबाबदारी
पुणे महापालिकेकडेच आली. त्याचे सुमारे एकशे ऐंशी कोटी रूपये ऐनवेळी देण्याची वेळ
आल्याने तिजोरीवर ताण पडला.
या अर्थसंकल्पात एकूण साडेपाचशे कोटी रूपये जेएनएनयुआरएमपोटी धरले असून
त्यातील अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. हे पैसे येण्याची गॅरेंटी नाही म्हणून आपल्या खिशात किती पैसे आहेत हे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या