Skip to content
जाहिरात

दादांच्या बंडखोरांनी पाडले पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचेच उमेदवार

October 22, 2009

पुणे दि. २२ (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील निवडणूक गाजवली ती बंडखोरांनी. दादंच्या आशिर्वादाने या बंडखोरांनी राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार पाडून आघाडी व पक्षनिष्ठा धुळीला मिळवली. चिंचवड, भोसरी, आणि दाैडमध्य बंडखोर जिंकले असले तरी त्यांनी राष्ट्रवादीचेच संख्याबळ घटवले आहे.

पुणे जिल्हा हा काही वर्षांपूर्वी शरद पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेस जोरात होती. त्यात झंझावातातही भोरमध्ये अनंतरा थोपटे आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील तर पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस जीवंत ठेवली आहे. मात्र या निवडणुकीत दादांच्या बंडखोराने आघाडीचा धर्म मोडीत काढत चिंचवडमध्ये भोईर यांना पाडले. त्यांना राष्ट्रवादीच्या नरगसेवकांपासून सर्वांनी साथ दिली. भोईर यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी सभा घेतली पण त्यांनाही कोणी जुमानले नाही. त्यांनी भोसरीत मंगला कदम यां पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी सभा घेतली पण बंडखोर विलास लांडे यांनी ती आज सतराशे मतांनी फ्लॅाप ठरवली.
सर्वात चुरस होती ती शिरूर मध्ये कारण तिथे भाजपाचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीटाचे आश्वासन देण्यात आले होते. पण नेत्यांनी ते पाळले नाही. त्यामुळे पाचर्णे यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांनाच घाम फोडला. अखेर पवार िनवडून आले. दाैडमध्ये सुभाष कुल यांचे चिंरंजीव राहुल कुल यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरवले होते. पण सुभाष कुल यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक रमेश थोरात यांनी त्यांना पाडले. या थोरातांना अशिर्वाद दादांचाच होता.
यांच्याप्रमाणे थोपटे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात बंडखोर उभे करून त्यांना दादांनी रसद पुरवली. पण हे दोघेही त्यांना पुरून उरले. त्यांनी आपापल्या जागा राखल्या. भोरमधून संग्राम थोपटे निवडून आले आहेत. दादांच्या आशिर्वादाने झालेल्या या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे अधिकृत संख्याबळ मात्र घटले.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या