Skip to content
जाहिरात

पुण्यात काँग्रेस आघाडी, युतीच्या मतात मनसे वाटेकरी

October 23, 2009

पुणे, दि. २३ (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीत पुण्यात काही नवी समीकरणे तयार झाली आहेत. या शहरात काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचे मतदार प्रामुख्याने आहेत. त्यात गेल्या तीन निवडणुकात महाराष्ट्र नवनिर्माण सेने मतांत वाढ करत आहे. पुण्यात स्वत:ची व्होट बँक पुण्यात तयार करण्याबरोबरच या चारही पक्षाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात राज ठाकरे यशस्वी होत आहेत.

नविन पक्ष स्थापवन करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या. त्यात पुण्यातही सभा घेतली. तसेच पक्ष स्थापनेनंतरही त्यांनी पुण्यात सभा घेऊन पुणेकरांना आपली भूमीका समाजावून सांगितली होती. मनसेची स्थापना होऊन साडेतीन वर्षे झाली. त्यात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या तिनही निवडणुकात पुण्यात मनसेला मिळणा-या मतात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत या पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले. त्यात काहीजणांनी ऐनवेळी सेना सोडून केवळ तिकीटासाठी मनसेचा रस्ता धरला होता. त्यातील काहीजण निवडून आले.
लोकसभेच्या मर्यादित जागा लढवताना राज ठाकरे यांनी जाणिवपूर्वक पुण्याची जागा लढवली आणि पाऊण लाख मत घेतली. विधानसभा निवडणुकीत त्यांचे कमीतकमी जागा लढवण्याचे धोरण कायम होते. त्यामुळे त्यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, वडगावशेरी या विधानसभेच्या जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले. मात्र कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवार दिलाच नाही. काल झालेल्या मतमोजणीत त्यांचे कसबा आणि कोथरूडमध्ये उमेदवार दोन नंबरवर आहेत. तर अन्य ठिकाणी तीन नंबरवर आहेत.
महापालिका निवडणुकीत मनसेला सर्व वाँर्ड मिळून सुमारे दीड लाख मत मिळाली होती. यंदा झालेल्या लोकसभा िनवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पाऊण लाख मत मिळाली. या निवडणूक प्रचारात झालेल्या मोठ्या नेत्यांच्या सभांमध्ये सर्वात जास्त गर्दी राज ठाकरे यांनी खेचली होती.
विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाच उमेदवारांना मिळून १७६२६४ मत मिळाली आहेत. त्याच वेळी सहाही मतदारसंघात असलेल्या सेना भाजप युतीच्या उमेदवारांना एकूण २६६६९५ तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळून २९०२२५ मत मिळाली आहेत. या शिवाय रिडालोसचे उमेदवार काही मतदार संघात होते पण त्यापैकी फक्त परशुराम वाडेकर यांनाचपंधरा हजार मत मिळाली आहेत, अन्य उमेदवार हे चार आकडी संख्येतच घुटमळले.
महापालिका निवडणुकीत २००७ साली मनसेला जेवढी मत मिळाली होती जवळपास तेवढीच मत या विधानसभेत पक्षाला मिळाली आहेत. त्यात कोथरूड आणि कसब्यातील उमेदवारांना युतीच्या बोलेकिल्ल्यात चाळीस हजारापेक्षा जास्त मत मिळाली. या शिवाय वडगावशेरी, शिवाजीवगर, पर्वती मतदारसंघात पक्षाचे नगरसेवक नसूनही त्या प्रत्येक ठिकाणी उमनेदवारांनी २५ हजारपेक्षा जास्त मत घेतली आहेत. याचाच अर्थ सेना भाजप बरोबरच ते काँग्रेस-राष्ट्रवादीची मत आपल्याकडे ओढण्यात यशस्वी झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते.तरूण पुणेकरांबरोबरच पेन्शनरांमध्येही राज ठाकरे यांचा करिष्मा असल्याचे दिसते.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या