

नोव्हेंबर महिन्याचे ग्रहमान - दि. 2 राहू धनू राशीत व केतू मिथून राशीत, दि. 3
शुक्र तूळ राशीत आणि दि. 12 बुध, रवी, शुक्र वृश्चिकेत जाणार
कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो या जगामध्ये ग्रह काम करत असतात. त्यांच्या
मूडनुसार अनेक घटना घडत असतात आणि त्या नुसारच माणसाला सुखदुख भोगावी
लागतात.
पूर्वी यशाचे गणित वेगळे होते. आता जीवनाची आकडेमोडच क्लिष्ट झाली आहे.
वाढत्या संधी, जिवघेणी स्पर्धा व जबरदस्त महत्वाकांक्षा या त्रिसूत्रिला तोंड देतादेता
बुध्दिमान माणसांची दमछाक होत आहे. जीवनात यशस्वी होणे हा अनिवार्य भाग आहेच
परंत्नु आज एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण असणे, भावनिक संतुलन संभाळणे हा यशाचा
महत्वाचा भाग झाला आहे.पारंपारिक व्यावसाय व नोकरी यासाठी केवळ अभ्यासातील
ङुशारी उपयोगी पडत नाही. त्यावेळी भावनात्मक बुद्धिमत्ता ही यशाच्या पाय-यांवरील
चढाई सहज साध्य करते काण यश मिळवण्यासाठी किती वेगाने धावायचे, कुठे थांबायचे
हे सुध्दा कळणे आवश्यक आहे. यासाठी ग्रहांची भाषा घेणे फारच उपयोगी पडते.
नोव्हेंबर महिन्यात मोठ्या घडामोडी ग्रहांच्या दृष्टीने घडणार आहे. सुरूवातीला दि.2ला
मंगळकेतू यांची युती संपेल कारण ती संपल्या शिवाय दिलासा देणा-या घटना घडणार
नाहीत. नवीन वर्षात कुजस्तंभ होणार असून ( मंगळ स्तंभी होणे यालाच कुजस्तंभ
म्हणातात.) दि. 5 आॅक्टोबरपासून कर्क राशीत आलेला मंगळ 26 मे 2010
पर्यंत भ्रमण करणार आहे. या काळापैकी दि. 10 डिसेंबर ते 10 मार्च या काळात
मंगळ वक्री होणार आहे. हा मंगळ वक्री व मार्गी होताना स्तंभी अवस्थेत राहील. दि.
27 जानेवारी या दिवशी मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ असेल.असे मंगळाचे जवळ येणे
हे अतिशय खळबळजनक ठरणार आहे. युद्धे, प्रकोप तसेच माणसांची वृत्ती,
स्वभावसुद्धा अनाकलनीय राहील. लहान मुलींवरचे बलात्कार, रेल्वे अपघात आिण
अनेक कारणांमुळे दुष्ट प्रवृत्तीना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र ढवळून
निघणार आहे.
कालसर्प
या महिन्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे राहू आणि केतू हे त्यांच्या नीच राशीत प्रवेश
करत आहेत. दि. 8 ते 24 दरम्यान ते कालसर्प आकारात येत आहेत. चंद्र कुंभ
राशीत गेल्यावर कालसर्प योगाचा भंग होईल. या राहूकेतू बदलांमुळे लेखक, कलाकार,
खेळाडू, शेतकरी, साहित्यिक यांना कठीण काळ आहे. या काळात रेल्वे, एसटी,
पोस्ट. टीव्ही यांच्या सेवेबाबत नाराजी होण्याची शक्यता आहे. रेल्वे दुर्घटनामध्ये वाढ
होण्याची शक्यता आहे. धार्मिक गोष्टींकडे समाज झुकला जाईल. मात्र डिसेंबर नंतर
पाण्याचे प्रश्न, वीज टंचाई, शेअर मार्केटमधील मंदी, घर, जमीनीचे पडते भाव
पिकांचे नुकसान या गोष्टींमध्ये सुधारणा दिसेल. या काळात जास्त त्रास धार्मिक पक्षांना
होण्याची शक्यता असून शिवसेना भाजपमध्ये फूट पडेल.
कन्या रास ही विरोधकांची व शत्रूंची रास मानली जाते व त्याच राशीत शनी महाराजांना
आगमन झाल्याने ते विरोधी पक्षांची ताकद कमी करणार आहेत.महाराष्ट्राच्या विधानसभेत
हा अमुभव येणार असून सत्ताधारी पक्षांची तादक वाढलेली दिसेल. समाजातील
गुन्हेगारीला आळा बसेल, देशांतर्गत सुरक्षा व शांतता निर्माण करण्यात यश येईल. मोठी
नोकर कपात होण्याची शक्यता असून व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे.असाध्य
रोगांवर औषधे निर्माण करण्यात डाॅक्टरांना यश येईल.
वृषभ, कन्या व मकर या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या मनासारखे वागता येईल.
मिथुन, तुळ, कुंभ व मीन राशींच्या व्यक्तींना जरूरीपेक्षा जास्त कष्ट केल्याशिवाय यश
पदरात पडणार नाही.
मेष, सिंह, धनू या राशींच्या व्यक्तींना राग आपल्या ताब्यात ठेवावा व दुस-यांचे
ऐकाण्याचे धोरण त्यांना फायदेशीर ठरेल. कर्क, वृश्चिक, मीन राशींच्या व्यक्तीनी
आलेल्या संधीचा फायदा घेऊन जास्तीतजास्त सकारात्मक धोरण ठेवले तरच त्यांना यश व
प्रसिद्धी लाभेल.
121 शनिवारपेठ, नेने घाट पुणे - 30.
24457889 किंवा 9823322117
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.
