

पुणे, (प्रतिनिधी)- निवडणुकीत सोने अंगावर घालून मिरवणा-या मनसेच्या रमेश वांजळे हे चर्चेचा व टीकेचा विषय ठरले होते. त्यांच्या आमदारकीचा कालचा पहिला दिवस, त्याच दिवशी हिंदीतून शपथ घेणा-या आबू आझमीच्या पुढचा माईक ओढताना वांजळे सोन्यासाऱखे चमकले.
विधीमंडळात सभागृहात शपथ घेण्यापूर्वीच वांजळे व मनसेच्या अन्य आमदारांनी गोंधळ घालून राडा केला. त्यामुळे सरकारपेक्षा मनसेचे आमदारच जास्त चर्चेचा विषय दिवसभर होते. त्यात आघाडीवर वांजळे होते. खरतर वांजळे पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून आले. त्यांना काँग्रेस, सेना, भाजप कोणीच तिकीट दिले नाही, पण अखेर राज ठाकरे यांनी त्यांना मनसेचे तिकीट दिले इतकेच नाही तर त्यांच्यासाठी सभाही घेतली. त्यावेळी ठाकरे यांनीही वांजळे यांच्या सोने अंगावर मिरवण्यावर नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. तशी नाराजी त्यांनी एकवीरा देवीच्या दर्शनाच्यावेळीही व्यक्त केली होती.
नेत्याच्या या नाराजीवर आमदारकीची शपथ घेतल्यावर सोने उतरवू असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच गोंधळात वांजळे आघाडीवर राहिले आणि अन्य तीन सदस्यांबरोबरच चार वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या अंगावरील सोन्याचे काय याची चर्चा सुरू झाली.
मात्र राज ठाकरे यांना भेटल्यावर घरातील मंगल कार्यात व काही महत्वाच्या वेळी सोने घालण्याची परवानगी वांजळे यांनी मागितली अन ठाकरे यांनी ती दिली. त्यामुळे आता वांजळे यांनी अंगावरील सोने उतरवले तरी ते महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात झालेल्या अधिवेशनात गोंधळ घातल्याबद्दल सोन्या सारखे चॅनेलवर चमकले .
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या