

यावेळी महाराष्ट्राच्या जनतेचे चांगला कौल देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी पुरेशा जागा दिल्या. तरीही सरकार स्थापन करण्यात दोन्ही काँग्रेसला तब्बल 17 दिवस लागले. राज्यासमोर व देशासमोर मोठी आव्हाने ठाकली असताना ती पेलण्यासाठी खर म्हणजे सरकार स्थापन होणे गरजेचे असते, परन्तु दोन्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद, खातेवाटपाच्या अटी, शह-काटशह सुरू झाले. आघाडी मिळाल्यानंतर पुन्हा पुन्हा नाईलाजाने एकत्र येण आणि नांदवून घेणे अवघडच आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यापुढे सरकार चावण्यात सगळ्यात मोठ आव्हान हेच आहे.
महाराष्ट्राची रास मुथुन आणि लग्न धनु. कुटुंब स्थानातील गोचरीचे गुरू, नेपच्युन व राहू तसेच अष्टमातील गोचरीचा मंगळ हे नवीन सरकार बनवण्यातील मोठे अडथळे ठरले. गोचरीचा मंगळ मूळ हर्षल बरोबर चंद्राच्या राशीतील आहे. मंगळ नीच राशीत असून त्याची दृष्टी कुटुंबस्थानावर आहे. त्यामुळे नवीन सरकार निर्मीतीबाबात वाद विवाद, संघर्ष, अचानक नविन निर्णँय घ्यायला लागणे, मनाविरूद्ध निर्णय घ्यायला लागलेले आपण बघितले.मंगळ पंचम आणि व्ययस्थानाचा स्वामी अष्टमात या दुखद स्थानी आलेला आहे. त्याची काही नकारात्मक फळे दिल्या शिवाय तो रहाणार नाही.पंचम स्थान हे नवनिर्मीतीचे स्थान आहे. हा पंचमेश अष्टमस्थानी आल्यामुळे काही भरघोस जडजोडी तो आघाडी सरकारला करायला लावणार आहे.लग्नेश गुरू नीच राशीत कुटुंबस्थानी व्ययेश मंगळ दृष्ट आहे. मूळ हर्षलचीही त्यावर असलेली दृष्टी सदस्यांच्या विक्षिप्त पणाला तोंड द्यायला लावणारी आहे. कुटुंबस्थानचा मालक शनी महाराष्ट्राच्या पत्रिकेत दशमस्थानी राहू बरोबर आहे. दिशाभूल करणा-यांव्यक्तींची त्याला साथ मिळालेली असल्यामुळे तो व्दीस्वभाव राशीत "रव" बिंदूवर असल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड दिसते. त्यामुळे स्वहिताच्या राजकारणाला मर्यादा आल्या आहेत. या मर्यादा पाळून बळ वाढवत नेणे ही कसरत वास्तवाचे पूर्ण भान ठेवून करावी लागत आहे. काँग्रेसने स्वतला लवचिक होण्याची गरज इथे भासते.
ज्या गोष्टी आतापर्यंत सभ्यतेच्या मर्यादांनी चर्चिल्या गेल्याहोत्या त्याची चर्चा सरकार बनवण्याच्या काळात खात्यांच्या रस्सीखेचाने उघड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला या निमित्ताने केवळ राज्यातच नाहीतर केंद्रीय पातळीवरही नामोहरम करण्याची इच्छा राज्यातून गेलेल्या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवल्याचे या निमित्ताने उघड झाले.
काँग्रेस जर स्वताला लोकशाही व धर्मनिरपेक्षवादी पक्षांचा मुख्य प्रवाह मानत असेल तर याच प्रवाहाच्या उपप्रवाहांना न्यायबुद्धीने सामावून घेणे ही काँग्रेसची जबाबदारी ठरते. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसच्या अवाजवी आक्रमणाबद्ल तक्रार करत आहेत त्याच मालिकेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली तर तो दोष काँग्रेसचाच ठरेल. आघाडीच्या राजकारणासाठी आपण अद्यापी अपरिपक्व आहोत हेच काँग्रेसने महाराष्ट्रात संख्याबळ असूनही 17 दिवस सरकार न बनवण्यातून दाखवून दिले आहे.
- डॉ. शिल्पा अग्निहोत्री
121 शनिवारपेठ, नेने घाट पुणे - 30.
संपर्क (+91020) 24457889 किंवा 9823322117
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.
