

पुणे, (प्रतिनिधी) - राज्यातील आघाडी सरकारचा शपथविधी होऊन पहिले अधिवेशनही झाले. ज्यावेळी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळची कुंडली बघता मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत किंवा ग्रह त्यांना कार्यकाळ पूर्ण करू देणार नाहीत, असे भाकीत ज्योतिर्वद सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.
मुख्यमंत्री पदाची अशोक चव्हाण यांनी शनि्वारी दि. 7 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथ घेतली तेव्हा राज्यात सरकार स्थापन झाले असे मानले जाते. त्यामुळे त्यावेळची म्हणजे दि. 7 ची कुंडली मांडून त्या आधारे सरकारचे ग्रहांवरून भवितव्य काय याचे भाकीत वर्तवण्याची पद्धत आहे. त्यानुसार मारटकर यांनी ही कुंडली मांडली आहे.
त्यानुसार पत्रिकेत लग्न मेष उदित असून, लग्न स्थानचा मालक मंगळ चतुर्थस्थानी कर्क या नीच राशीत केतू बरोबर आहे. चंद्र तृतीय स्थानी असून पुनर्वसू नक्षत्रात आहे. दशमस्थानी गुरू, राहू व नेपच्यून असे ग्रह आहेत. दशमस्थानचा मालक शनी षष्ठात आहे. सप्तमस्थानात तुळ राशीत रवी, शुक्र व बुध तर नवव्या स्थानात धनू राशीत प्लुटो असे ग्रह आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता मुख्यमंत्री चव्हाण त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत.
मंगळ दि. 20 डिसेंबरला वक्री होत असून मार्चपर्यंतचा काळ मुख्यमंत्र्यांसाठी अग्निपरिक्षेचा राहिल. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी कारवाया, वाढती महागई, सहका-यांचे असमाधान, वरिष्ठांची नाराजी, सरकारी कर्मचा-यांचे आंदोलन याप्रश्नांना तोंड देत सत्ता चालवणे मुख्यमंत्र्यांना अवघड जाणार आहे. ही परिस्थिती दि. 25 मे नंतर नियंत्रणाखाली येऊ शकते मात्र त्या पूर्वीचा काळ मंत्रीमंडळाला त्रासदायक दर्शवितो.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या