

पुणे, (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील गुन्हेगारी बाबात दरवर्षी गृह मंत्रालयाचे गुन्हे अन्वेषण विभागातर्फे अहवाल प्रसिद्ध केला जातो. गेल्या वर्षीची अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून तपासाचे व गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटले असल्याचे अहवालात देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे महाराष्ट्र हा गुन्हेगारांना अनुकूल असल्याचे सुकृत दर्शनी दिसते.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख एस.पी.एस यादव यांनी अहवालाची महिती दिली. या अहवालाचे प्रकाशन गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरीक्त महासंचालक डी. शिवानंद यानी केले. गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. त्यात विविध अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 13 हजार असून जखमींची संख्या 15 हजार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्यात वाढलेल्या गुन्ह्यांमध्ये मालमत्तेच्या व अर्थिक गुन्ह्यात झालेली वाढ मोठी आहे. त्यातही आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण पंधरा टक्क्यांनी वाढले आहे. गुन्ह्यांचे एकूण प्रमाण 5.4 टक्क्यांनी वाढले असून तपासात मात्र घट झाली आहे. तपासाचे प्रमाण 2007मध्ये अकरा टक्के होते तर गेल्यावर्षी ते 9.5 टक्के झाले आहे. त्याच बरोबर गुन्हेगारांना देण्यात येणा-या शिक्षेचे प्रमाणही घटले आहे. हिंसाचारात नागपूर, औरंगाबाद, बीड हे विभाग आघाडीवर आहेत. मात्र दरोडे सदृष गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या