

पुणे, (प्रतिनिधी)- येरवड्यात मागच्या आठवड्यात अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कैलास अमृता लष्करे या चौतीस वर्षीय तरूणास अटक केली आहे.तो तरूण मनोरूग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या लष्करे याने मंगळवारी (दि.10) दुपारी चारच्या सुमारास त्या मुलीला चॉकलेटचे अमीष दाखवून नेले होते. ती बेशुद्ध अवस्थेत दुस-या दिवशी सकाळी जेजे आपार्टमेंट जवळच्या कचरा कुंडीशी सापडली होती. तिच्या अंगावर कपडे नव्हते. हा लष्करे त्या मुलिच्या घरा शेजारी रहातो. तो कधी चहाचा स्ट़ॉल लावतो तर कधीमधेच बंद करून टाकतो तो मनोरग्ण आहे.
बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला पोलिसांकडे लष्करेच घेऊन गेला होता आणि त्यानंतर तोच पोलिसांबरोबर आरोपीचा शोध घेत फिरत होता. त्याच्या विसंगत वाघण्याचा संशय येऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या