

पुणे, (प्रतिनिधी)- आपण केलेल्या खूनाचा आरोप मित्रावर देऊन त्याच्या सास-याकडून तीन लाख रूपये उकळणयाचा प्रय़त्न फसला व आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी आरटीओ कार्यालयात झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी शिवाजी भातकर याला अटक केली आहे.
भातकर व मयत सुरेश कदम यांचे किरकोळ वाद होते. त्या दिवशी रात्री शिवाजीने सुरेशला आपल्या बरोबर नेले आणि दारू पाजली. त्यानंतर त्याचा सुरीने गळा चिरला. त्याचा कान कापून बरोबर नेले. याचा कानाने त्याला पोलिसांच्या जाळयात आडकवले.
शिवाजीने अक्कल हुशारीने मयत सुरेशच्या खिशात तसेच तेथे पडलेल्या ग्लासांवर काही अन्य लोकांची नावे लिहून ठेवली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली होती. त्या नावांमध्ये एकाचे नाव होते त्याची सासूरवाडी सांगली जिल्ह्यात वीटा येथे असून नारायण सिद्धू माने असे सास-याचे नाव आहे. खून करून शिवाजी वीटा येथे गेला. त्याने ज्याचे नाव लिहीले होते त्याच्या सास-याला भेटला.
सासरा नारायणला भेटून त्याने तुमच्या जावयाला खून प्रकरणात आपण अडकवले असल्याचे सांगितले व त्याला सोडवण्यासाठी तीन लाख रूपयांची मागणी सास-याकडे केली. पुरावा म्हणून त्याने कापलेला कान त्या सास-याला दिला. इकडे पोलिस तपास सुरूच होता.
पोलिसांनी चिठ्ठीतील व ग्लासावरील नावांवरून तपास करण्यास सुरूवात केली. ज्यांची नावे त्यात होती त्यांच्याकडे तपास करताना पोलिस शिवाजीपर्यंत पोचले व त्याला अटक केली. शिवाजीने वीटा येथे नारायण माने यांच्याकडे गेल्याचेही कबूल केले. कापलेला कान नारायण माने यांनी पोलिसांकडे न दिल्याने आरोपी सापडण्यास विलंब झाला त्यामुळे त्यालाही आरोपी कऱण्यात येणार आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या