

फुले हा निसर्गातील एक चमत्कार आहे. सुंदर सुंदर नाजूक फुले समुद्र सपाटीपासून ते हिमालयापर्यंत सर्वत्र दिसतात. कुठेही फुले बघितली की मनाला प्रसन्नता टवटवीतपणा येतो. फुलांच्या या आकर्षणामुळेच त्याचे अर्क काढून अत्तरे, उदबत्या केल्या जातात. फुलांचे हार, गुच्छ, गालिच्छे केले जातात. भारतीय संस्कृतीत फुलांना फार महत्व आहे. कोणताही मंगल प्रसंग फुलांशिवाय पार पडतच नाही.कारण फुलांचे रंग, सुगंध, रचना वातावरणात बदल घडवण्यासाठी खूप उपयोगी पडतात.नवचैतन्य आणण्याचे सामर्थ्य या नाजूक फुलांमध्ये असल्यानेच फुले अर्पण केल्याशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही.स्वभावाला औषध नाही अस इतके दिवस आपण म्हणत होतो ना पण आता याच फुलांचा वापर करून त्यापासून स्वभावावरही औषधे तयार झाली आहेत.
अशा या फुलांचा उपयोग आय़ुर्वेदात करण्यात आला आहे.काही औषधे करताता त्यात
फुलांचा वापर केला जातोच. याचाच उपयोग करून इंग्लंडमधील डॉ. बॅच यांनी फुलांपासून पुष्प औषधी तयार केल्या आहेत ज्या बॅचफ्लॉवर म्हणून प्रचलित झाल्या आहेत. आज आपण ही बॅच फ्लॉवर इंग्लंडहून आयात करतो. प्रामुख्याने ही औषधे मानसिक उपचारासाठी उपयुक्त ठरताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी तर हीच औषधे चांगली असतात. या पुष्पऔषधींचा दिवसेंदिवस वापर वाढत आहे. त्यामुळे या औषधांची आयात करण्यात जास्त परदेशी चलन द्यावे लागत आहेत. आपल्या देशात सर्वच प्रकारची फुले होतात जर या फुल शेतीला प्रधान्य दिले गेले तर पुष्प औषधी तयार करणारा नवा उद्योग उभा राहू शकतो. त्यातून शेतक-यांना जोडधंदा मिळेल हे नक्की.
कस जगायचं हे आपल्या हताता असते. त्यातही चांगले जीवन जगणे हे तर प्रत्येकाच्या हातात असते. आय़ुष्यातील खाचखळगे ओलांडून जीवनात यशस्वी होण्यासाठी, सकारात्मक जगण्यासाठी अनेक उपाय आहेत. "स्वभावाला औषध नाही" हे कायम सर्वजण वापरत असतात पण हेच नकारात्मक विधान बॅचफ्लॉवरने खोटे करून दाखवले आहे. स्वभाव दोष दूर करून जीवनात चैतन्य फुलवण्याचा प्रयोग डॉ. एडवर्ड बॅच यांनी पुष्प औषधीव्दारे यशस्वी करून दाखवून मानवाला देणगीच दिली आहे.
खरतर डॉ. बॅच हे ऍलोपॅथीचे पदवीधर होते. पण होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. हॅनीमन यांच्या विचारांनी प्रभावित होऊन डॉ.बॅच यांनी पुष्पऔषधी उपचार पद्धती विकसीत करण्याचे काम सुरू केले. कोणताही आजार लवकर बरा होण्यासाठी शरीराला जशी औषधांची गरज असते तितकेच त्या रुग्णाचे मानसिक आरोग्य चांगले रहाणे त्याला लवकर बरे होण्यासाठी तेवढेच उपयुक्त ठरते. कारण मन आणि शरीर हे अविभाज्य घटक आहेत.त्यांचा एकमेकांवर कायम प्रभाव असतो. त्या प्रभावाखाली असलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक प्रवृत्ती शरीरावर परिणाम करत असतात. त्यामुळे शाररीक व्याधीं सुरू होतात.
मानसिक त्रासावर औषधे
हीच अवस्था विचारत घेऊनच शाररीक त्रासापेक्षा मानसिक त्रासाकडे लक्ष देऊन पुष्पऔषधी या निवडल्या जातात. कोणताही मानसिक त्रास का होतो आहे ? याचा इतिहास समजून घेऊन समस्येच्या मूळाशी गेले की आजाराचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत जाते आणि त्या त्या स्वभावदोषानुसार विशिष्ट औषध निवडून उपचार व समूपदेशन केल्यास प्रकृती सुधारत जाते.
पुष्प औषधी ही फुलांच्या अर्कापासून तयार केलेली असतात. मानवी स्वभाव दोषांवर उपचार म्हणून या औषधांचा वापर केला जातो. एकूण 38 प्रकारची ही औषधे मानवी मनाच्या विविध पैलूंचा आरसाच आहे.औषधांची लक्षणे आणि स्वभावदोष यांची जुळवणी करून समचिकीत्सेप्रमाणे औषधे देण्यात येतात. या औषधांचे प्रमाण कमी जास्त झाले तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम (साइड इफेक्टस) शरीरावर होत नाही.म्हणूनच ही पुष्पऔषधी आपल्याला विविध स्वभाव दोष घालवण्यासाठी गुणकारी ठरतात. या पुष्प औषधींची महिती पुढे एकेक भागात दे्ण्यात येणार आहे.
आशा ही माणसाला जगण्यासाठी कारणीभूत ठरते. आपले मन चंचल असून ते आशा निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावे घेत असते. हे हेलकावे पूर्ण थांबवता येत नसले तरी त्यांचे संतुलन राखण्याचे काम या पुष्पऔषधी करतात. आशा-निराशा, उत्साह-निरूत्साह, भित्रेपणा-बेडरपणा, स्थैर्य अस्थिरता अशा अनेक परस्पर विरोधी लाटा मनात उचंबळत असतात.त्याचेच परिणाम मनावर व पुढे वागण्यावर होत असतात. ही प्रक्रिया कधी जलद तर कधी सावकाश होत असते त्यामुळे या परस्पर विरोधी लांटांचे परिणाम शरीरावर होत असताना त्या व्यक्तीला जाणवत नाहीत. या सर्व भावनांचा मनावर होणारा परिणाम दूर करण्याचे काम या पुष्पऔषधी करतात.
ही पुष्पऔषधी कोणी घ्यावी याला वयाचे बंधन नाही. बरं ही घ्यायलाही सोपी आहेत. एकतर पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात घेता येतात किवा होमिओपॅथीच्या गोळ्यांवर टाकून घेता येतात.त्यामुळे ख-या अर्थाने ही पुष्पऔषधी स्वभावाला औषध म्हणून उपयोगी ठरत आहेत.
डॉ. दीपाली लडकत
919422016830
dipali.ladkat@yahoo.com
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या