

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्यातील कोंढवा येथील एक सोसायटीची बंद पडलेली लिफ्ट
दुरूस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक लिफ्ट सुरू झाल्याने लिफ्ट व
भिंत यामध्ये चिरडल्याने तंत्रज्ञाचा मृत्यु झाला आहे.
ही घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. कोंढव्यातील कोणार्कपूरम या
अलिशान सोसायटीतील बी इमारतीची लिफ्ट बंद पडली होती. ती दुरूस्त करण्यासाठी
आय़डियल एलेव्हेटर कंपनीचे तंत्रज्ञ बालाजी पांचाळ आले होते. ते दुरूस्तीचे काम करत
असताना लिफ्ट अचानक सुरू झाली. त्यामुळे लिफ्ट व भिंत यात पांचाळ चिरडले
गेल्याने त्यांचा मृत्यु झाला.
तातडिने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी अवघ्या वीस मिनिटात
पांचाळ यांना बाहेर काढले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांचे वय अवघे
पस्तीस वर्षाचे असून त्यांच्यामागे पत्नी व मुलगी आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या