Skip to content
जाहिरात

पुणे पोलिस म्हणतात आमच्याकडे हेडलीची महिती नाही!

November 16, 2009

पुणे , (प्रतिनिधी) - मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील प्लॅनर हेडली याला अमेरिकेत अटक करण्यात आली. तो मुंबईसह पुणे व अन्य शहरात येऊन गेल्याची महिती पुढे आली आहे. त्याचबरोबर त्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पुळून जाण्यास मदत केल्याची महिती प्रसिद्ध झाल्यावरही पुणे पोलिस म्हणतात की आमच्याकडे हेडली बाबात काही महिती नाही.

गेले तीन चार दिवसापासून हेडली हे नाव भारतातील माध्यमांमध्ये गाजत आहे. त्याने
मुंबईतील ताज हॉटेलसह अन्य महत्वाच्या ठिकणाची महिती दहशतवाद्यांना दिली होती.
त्यासाठी त्याने याच हॉटेलमध्ये मुक्कामही केला होता. अशी अनेक प्रकारची रोज नवी
महिती उघड होत आहे.
याच हेडलीने मुंबईतील जु्न्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पळून जाण्यास मदत केली
असल्याची बाबाही उघड झाली आहे. पुण्यातील सीमी या संघटनेच्या कार्यकर्त्याने दोन
दहशतवाद्याना देशाबाहेर पळून जाण्यास याच हेडलीची मदत घेतली अशी महिती पुढे आली
असली तरी पुणे पोलिस मात्र त्या बाबत अजूनही अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत.
गेल्या काही वर्षात पुण्यातील सीमीच्या कार्यकर्त्यांचे आणि दहशतवाद्यांचे संबंध असल्याचे
अनेक पुरावे पुढे आले आहेत. काही महत्वाच्या नेत्यांच्या हत्येचे कटही या कार्यकर्त्यांनी
रचल्याचे पुढे आले आहे. याच काळात पुणे हे महिती तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रात पुढे
येत होते. शहरात पैशाचे चलनवलन वाढले. मात्र देशातील अन्य शहराच्या तुलनेत पुणे
हे दहशतवादी कारवायांच्या दृष्टीने शांत राहिले आहे. पुण्यात दहशतवादी कारवाया किंवा
बॉम्बस्फोटासारख्या घटना अद्याप फरशा घडलेल्या नाहीत. याचे मु्ख्य कारण म्हणजे पुणे
हे देशात अशा कारवाया घडवण्याच्या द़ष्टीने हलचाली करण्याचे दहशतवाद्यांचे मुख्य केंद्र
राहिले आहे.
पुण्यातील एनडीएतील एक प्राध्यापकाचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्याच बरोबर पुण्यात सीमीचे कार्यकर्ते सक्रीय असून दुसरीकडे शिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थ्यी परप्रांतातूनच नव्हे तर परदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावर पोचले आहे. म्हणूनच येथे जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पुण्यात लष्कराच्या अनेक महत्वाच्या संस्था आहेत. दारूगोळा कारखाना आहे. तसेच
महत्वाच्या व्यक्तींची येजा पु्ण्यात वरचेवर असते. पुण्याचे नाव गेल्या काही वर्षात
जगाच्या नकाशावर गेले असूनही दहशतवादी फक्त येथील संस्थांची महिती व छायचित्रे
घेण्याशिवाय काहीच करताना सापडलेले नाहीत. त्यामुळेच पुण्याचा वापर ते हलचालींचे
केंद्र म्हणून करत आहेत त्याचाच एक भाग म्हणजे हेडलीसारख्यां बरोबर येथील सीमीच्या
कार्यकर्त्यांचे असलेले संबंध व हेडलीकडे सापडेले एनडीएची महिती होय असे एका माजी
अधिका-यांने सांगितले.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या