Skip to content
जाहिरात

पुण्याच्या ओशो आश्रमात हेडली होता का बाहेर फिरत होता!

November 17, 2009

पुणे, (प्रतिनिधी)- संशयीत दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी हा पुण्याच्या ओशो आश्रमात दोनदा येऊन गेल्याचे आश्रमाच्यावतीने पोलिसांना कळवण्यात आले होते. मात्र आश्रमात मेडिटेशनसाठी नावे नोदवलेले साधक हे त्या मेडिटेशनला हजर आहेत किंवा नाही याची कोणतिही महिती आश्रमाच्या व्यवस्थापनातर्फे ठेवण्यात येत नाही.त्यामुळे हेडली हा नाव नोदवून आश्रमातच होता की पुण्यात फिरत होता याची कोणतिही महिती आजतरी उपलब्ध नाही.

अमेरिकन गुप्तचर खात्याच्या ताब्यात सध्या हेडली असून त्याचा भारतातील तपास राष्ट्रीय गुप्तचर संस्था (एनआयए) करीत आहे. त्याचे पथक पुण्यात येऊन हेडलीचा तपास करून गेले. त्यानंतर तो दोनदा पु्ण्याच्या ओशो आश्रमात येऊन गेल्याची महिती पुढे आली आहे.
ही महिती आश्रमानेच पोलिसांना दिल्याचे पोलिस सहआय़ुक्तांनी आज पत्रकारांना सांगितले. त्यानंतर ओशो आश्रमात संपर्क साधला असता ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टच्या पवक्त्या अमरित साधना यांनी ही बाब मान्य केली. मात्र मेडिटेशनचे दिवसभारत अनेक कोर्सेस असतात साधक त्यांना हव्या त्या कोर्ससाठी नाव नोदवतात. एकदा नाव नोदल्यावर तो साधक त्या कोर्सला हजर आहे किंवा नाही याची कोणतिही नोंद आश्रमात ठेवली जात नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
त्यामुळे हेडली प्रकरणातील गुंतागुंत वाढत असून तो नक्की नाव नोंदणी केलेल्या कोर्सला
हजर होता का नाही याची कोणतिही महिती आजतरी पोलिसांकडे नाही. तो बिझनेस व्हीसावर पुण्यात आला होता. मात्र नाव नोंदवल्यावर तो आश्रमात होता का अन्य कोणाला भेटला या संबंधीची महिती कोणाकडे नाही. याच दिशेने पोलिस महिती घेत असून ती एनआय़एला कळवण्यात येत आहे. पुण्यात हेडली कोणाला भेटला कुठे गेला याची महिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या