

पुणे, (प्रतिनिधी) - संशयीत दहशतवादी डेव्हीड हेडली याच्या बद्द्लची महिती घ्यायला पुणे पोलिसांनी सुरूवात केली असल्याचे आयुक्त डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले. दरम्यान, तो कोरेगावपार्कमधील सूर्या व्हीला हॉटेलमध्ये उतरला होता अशी महिती त्यांनी दिली.
या वर्षी मार्च महिन्यात हेडली हा सूर्या व्हीला या हॉटेलमध्ये उतरला होता. तो 16 मार्चला सकाळी दहा वाजता हॉटेलमध्ये आला व त्याने 17 मार्चला सकाळी आठ वाजता हॉटेल सोडले अशी महिती हॉटेलने पोलिसांना दिली आहे.
या शिवाय ओशो आश्रमात वर्षाला सुमारे एक हजार परदेशी नागरीक येतात. त्यांची नियमीत महिती आश्रमाकडून पोलिसांना देण्यात येते असे आय़ुक्तांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास एनआयए करत असल्याने पोलिसांना मिळणारी सर्व महिती अगोदरपासूनच त्यांना देण्यात येत असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. त्यांच्या तपासात कोणताही हस्तक्षेप न करता पुणे पोलिस या प्रकरणाची अधिक महिती घेत आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या