Skip to content
जाहिरात

नोह्वेंबर महिना संकटांचाच दहशतवादी भयान ते फयान !!

November 19, 2009

श्री
राहू-केतूच्या हे जरी ग्रह असले तरी त्यांच्या संदर्भात एक गोष्ट सांगतात की, अमृत प्रशानाच्या वेळी देवांच्या रांगेत बसलेल्या विधुवंत या राक्षसाचा विष्णूने शिरच्छेद केला.त्यानंतर त्या राक्षसाचे धड देवांच्या रांगेत राहिले हाच नवग्रहातील केतू होय. त्या राक्षसाचे शिर तुटून पडले ते राक्षसाच्या बाजूला हाच नवग्रहातील राहू होय. कुंडलीमध्ये राहूकेतूच्या एकाच बाजूला म्हणजे राहूपासून केतूपर्यंत किंवा केतूपासून राहूपर्यंत ग्रह असतील तर त्याला ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग म्हणतात. गुरू आणि शनी या ग्रहांच्या बदला इतकेच महत्व राहू केतूच्या राशी बदलाला आहे.
या महिन्यात दि. 2 ला राहू आणि केतूनी राशीबदल केला. पुढील 18 महिने राहू धनू तर केतू मिथुन राशीत रहाणार आहेत. निसर्ग कुंडली प्रमाणे दि. 8 ते दि. 24 नोव्हेबरपर्यंत कालसर्प योग आकारात आहे म्हणजे सध्या तो सुरू आहे. चंद्र कुंभ राशीत जाईल त्यावेळी या योगाचा भंग होईल. राहूला सर्पाचे तोंड तर केतूला सर्पाची शेपटी समजले जाते. या योगाबरोबरच चतुर्थस्थानी कर्क या जलराशीत आलेला मंगळ त्यात भर टाकणारा आहे.
सध्या हवामानात झालेल्या बदलाचा आपण अनुभव घेत आहोत. पावसाळ्याचे दिवस नसतानाही कोसळत असलेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला तरी पिकांचे मोठे नुकसान त्याने केलेले आहे. जलराशीतील या मंगळाने नको त्यावेळी पाऊस पाडून डोळ्यात पाणी आणणारी परिस्थीती निर्माण केली आहे. त्याच दरम्यान फयान या चक्री वादळाने महाराष्ट्रासह तीन राज्यातील जनजीवन विस्कळीत केले होते. अशाच प्रकारची संकटे पुढे येऊ घातली आहेत. रेल्वेचे अपघाच वाढतील, अतिरेक्यांचे फावणार असल्याने ते पळता भुई थोडी करतील. अवेळी पावसाने हाताशी आलेला पीकांचा घास घेतल्याने महागईचा उच्चांक होईल व तो मध्यमवर्गियांना सळो की पळो करून सोडेल. इतक्यावरच हे थांबणारे नाही तर यात भुकंपांच्या धक्क्यांची भर निसर्ग टाकणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्या स्मृती ताज्या असताना यंदा नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच वादळाने तडाखा दिला. अजून नोव्हेंबर महिना संपलेला नाही. दहशतवादी हल्ला, वादळ नोव्हेंबर महिन्यात घडल्या असल्याने हा महिना संकटांचा की काय अशी भावना झाल्याशिवाय रहाणार नाही. गेल्यावर्षी मुंबईवर समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी भयान हल्ला केला होता. यावेळी अरबी समुद्रातील चक्रीवादळ फयानने हल्ला केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रत्यक्ष
वा अप्रत्यक्ष परिणाम देशातील बहुतेक ठिकाणी उमटतील.संकटे नैसर्गिक असोत की मानव
निर्मीत त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. हा अवेली पाऊस
रब्बीच्या पीकांना चांगला असला तरी त्याने हाताशी आलेली कापूस, तूर, फळबागा, भात,कांदा या पीकांना जोरदार फटका दिलेला असल्याने त्यांचे भाव कडाडतील. त्या शिवाय साथीच्या रोगांचा प्रर्दुभाव वाढण्याचा धोका आहे. डेंग्यु, हिवतापानो डोके वर काढलेच आहे. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा घेणा-यांचे नको तेवढे फावणार आहे. शेवटी या सगळ्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्यांच्या वैक्तीक जीवनावर झाल्या शिवाय रहाणार नाही. शुभ भवतु

- डॉ. शिल्पा अग्निहोत्री
121 शनिवारपेठ, नेने घाट पुणे - 30.
संपर्क (+91020) 24457889 किंवा 9823322117