

एक वृद्ध आजी...सत्तरी गाठलेल्या पण चेह-यावरून अतिशय उत्साही...आनंदी दिसत होत्या. आजींना त्यांची मुलगी घेऊन आली होती. कारण काय होते तर त्या आजींना रात्री झोप येत नाही आणि झोप आली नाही की त्या काहीतरी काम काढून बसत असत. असे अनेक महिने चालले होते. पण माझ्याकडे येण्याच्या दोन दिवस अगोदर त्या आजींना चक्कर येऊन त्या पडल्या आणि तासाभराने मला काही झालेच नाही असे म्हणून लगेचच कामाला लागल्या. त्यानंतर मी त्यांच्याकडे थोडी चौकशी केल्यावर समजले की त्यांचे यजमानांना पॅरेलिसीस असल्याने त्याना खूप संभाळावे लागते आणि याची जबाबदारी त्यां आजींवरच पडते. या वयातही त्या घरातील केवळ यजमानांचेच नाही तर सर्वांचेच उत्साहाने आनंदाने सगळ करत होत्या. या कामाच्या धकाधकीत त्यांचा रक्तदाब वाढायला सुरूवात झाली हे घरातील सर्वांना आजींना चक्कर आल्यावर समजले होते. त्या आजींना मी अॅग्रीमनी ही पुष्पऔषधी द्यायला सुरूवात केली आणि त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला. त्यामुळे आंनंदी मुखवटा धारण केल्यानंतर त्याच्या खाली जो दुःखी चेहरा होता त्यासाठी अॅग्रीमनी खूप उपयोघी पडले होते.
पुष्पऔषधींची महिती घ्यायला आपण सुरूवात केल्यावर पहिले औषध. आनंदी चेह-यामागे काळजी लपवणा-या व्यक्तींसाठी हे औषध लागू पडते. किंबहुना अशा स्वभावामुळे येणा-या मानसिक व शाररीक व्यांधींसाठी हे उपयुक्त ठरते. एक गोष्ट नक्की की पुष्प औषधी ह्या लक्ष्णसाधर्म्यास अनुसरून दिली जातात. होमिओपॅथीप्रमाणेच रूग्णांची लक्षणे व औषधांची लक्षणे यांच्यातील साम्य म्हणजेच त्या रूग्णाला ते औषध योग्य अशी या मागची संकल्पना आहे.
व्यक्ती किंवा रूग्ण कसे असतात
हे औषध ज्यांना लागू पडू शकते त्या व्यक्ती किंवा रूग्ण हस-या चेह-याचे, सतत आनंदी दिसतात. त्या शांततेच्या भोक्त्या असतात. वादविवाद किंवा घासाघीस त्यांना आजिबात आवडत नाही. आपल्या समस्या किंवा वेदना, दुःख त्यांना कुणाजवळ बोलून दाखवायला आवडत नाही. आपल्यापासून कोणालाही त्रास होऊ नये म्हणून या व्यक्ती चेह-यावर आनंदाचा मुखवटा धारण करून फिरत असतात. कोणी त्यांची चौकशी केली तर हसून वेळ मारून नेण्याकडे त्यांचा कल असतो.
अशा व्यक्ती ब-याचदा दुःख विसरण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाते. एकाकी पडते. नैराश्याच्या पाशात गुंतू शकते. केवळ मुखवटा धारण करून आपले दुःख सावरणा-या व्यक्ती म्हणजे अॅग्रीमनी व्यक्ती होत. त्या आजारपणातही आनंदी रहातात. शांततापूर्ण वातावरण निर्माण करून त्यात रहाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा अशा व्यक्ती मला काही झालेले नाही सहज म्हणून तुम्हाला भेटायला आलो असेच म्हणतात. मनाच्या कोंडमा-यामुले भावना दाबून टाकल्यामुळे अस्वस्थ स्वभावाचे पर्यावसन शाररीक व्याधी जडण्यात होते. रात्री झोप न येणे, हृदयरोग, अतिरक्तदाब, अल्सर, बद्धकोष्ठता, अन्नपचनाच्या तक्रारी, अर्धशिशी अशा प्रकारच्या व्याधी या व्यक्तींना ग्रासू शकतात. त्यामुळे त्यांना अॅग्रीमनी दिल्यास ती व्यक्ती एकाकी न पडता त्याला मनाला सावरण्यास मदत होते. कारण अनेकदा एकाकी पडलेल्या व्यक्तींचे मन कमकुवत झाल्यास आत्महत्या करण्याकडे यांचा कल झुकू शकतो. आपल्या समस्या, व्याधी विसरण्यासाठी सिगारेट, दारू, तंबाकू सारख्या व्यसनाच्या आहारी त्या जाण्याचा धोका असतो. या व्यसनाच्या आहारी जात असलेल्या व्यक्तींना सुरूवातीच्या काळात अॅग्रीमनी दिल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
वनस्पती काय आहे
अॅग्रीमनी ही वनस्पती इंग्लंडमध्ये सर्वत्र अढळणारी वनस्पती आहे. तिची फुले पिवळ्या रंगांची असतात. जेव्हा फुले पुर्ण उमलतात तेव्हा सोनेरी रंगांची दिसतात.हे झाड साधारण दोन ते तीन फूट उंच, माळरान किंवा खडकाळ जमिनीवर उगवते. या झाडांना जून ते ऑगस्ट या काळातच फुले येतात. त्यांची टोके अणकुचीदार असतात आणि फुले तीनच दिवस टिकतात.
महत्वाची लक्षणे
- वादविवाद, घासाघीस न आवडणारे
- सतत कार्यरत पण अस्वस्थ
- मैत्रिपूर्ण स्वभावामुळे समाजात लोकप्रिय असतात.
- वरकरणी आनंदी दिसतात पण काळजी लपवण्याचा स्वभाव असतो.
- कसलीही तक्रार न करण्याची वृत्ती असते.
- आजारपणातही आनंदी असतात.
- मनाच्या कोंडमा-यामुळे, भावना दाबून टाकण्यामुळे उदभवणारे त्वचा विकार, संधीवात, अर्धशिशी, बद्धकोष्ठता, अपचन, अल्सर आदी व्याधीं.
- मन कमकुवत झाल्यास आत्महत्या करण्याकडे कल अढळतो.
- दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीन होतात.
- शांततापूर्ण वातावरण निर्माण करून त्यात रहाण्याचा प्रयत्न करतात.
शेवटी अॅग्रीमनी म्हणजे काय ते बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे तर
"माझं दुःख माझं दुःख तयघर कोंडलं
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं"
डॉ. दिपाली लडकत
919422016830
dipali.ladkat@yahoo.com
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या