

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे शहर दिवसेदिवस वाढत असून त्याच बरोबर खून मारामा-या,लूटमारीचेही प्रकार वाढत आहेत. भरदिवसा इंदिरानगरमध्ये सराईत गुंडाचा खून होतो तर जंगली महाराज रोडवर बिल्डरच्या खूनाचा प्रयत्न होतो.
जंगली महाराज रोडवरील अनंत चेंबरमध्ये दुस-या मजल्यावर निखील रामकृष्ण राणे या
बिल्डरचे कार्यालय आहे. ते स्वतः वकील असून त्यांची पत्नी तसेच त्यांची वडिल रामकृष्ण राणे हे प्रख्यात दिवाणी न्यायालयातील वकील आहेत. त्यांनी बांधकामाचा व्यवसाय सुरू केला आहे.
सकाळी निखील राणे हे त्यांच्या कार्यालयात जात होते. ते पहिला मजला चढून गेल्यावर पाठिमागुन त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. हल्लेखोराला कोणी बघितले नसल्याची पोलिसांची प्राथमिक महिती आहे. मात्र त्या इमारतीच्या वॉचमनने काही महिती पोलिसांना दिली आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील कर्मचारी व निखील यांची पत्नी बाहेर आले तेव्हा त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्याला ताबडतोब संचेती रूग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेची महिती शेजारी शेअर ब्रोकरचे कार्यालय असून तेथील रजनी शहा यांनी दिली.
दुस-या घटनेत अप्पर इंदिरानगरजवळ सराईत गुंड अनिल गोराडे याचा अज्ञात हल्लेखोरांनी कोयता व हतोड्याने खून केला आहे. ही घटना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, दरोडे असे पंधरा गुन्हे दाखल आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या