

पुणे, (प्रतिनिधी)- घरातून विवाहाला होणा-या विरोधामुळे एक नुकत्याचा वयात आलेल्या प्रमी युगलाने पुणे रेल्वे स्टेशनवर गाडी खाली आत्महत्या केली आहे.
हे प्रमी युगल वीशीच्या आतले असून येरवडा भागातील लक्ष्मीनगरमध्ये रहाणारे आहे.यातील प्रमवीर प्रकाश माणिक गायकवाड असून त्याची प्रेमीक शीतल बन्सीलाल साळवे आहे. या दोघांकडे चिठ्ठी मिळाली असल्याचे समजते. त्यांनी सोमवारी रात्री पुणे रेल्वे स्टेशनवर गाडीखाली आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह सकाळी पोलिसांना मिळाले तेव्हा चिठ्ठी सापडली आहे.
गुंड गोराडे प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा
अप्पर इंदिरानगरमध्ये खून झालेल्या सराईत गुंड गोराडे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या भावाने या चारजणांची नावे पोलिसांना सांगितल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गोराडे याचा खून सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अप्पर इंदिरानगरच्या शेवटच्या बसस्टॉपजवळ हातोडा व कोयत्याने करण्यात आला होता.
दरम्यान बिल्डर निखील राणे याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी कोणतिही प्रगती झालेली नाही. निखीलवर तो कार्यालयात दुस-या मजल्यावर जिन्याने जात असताना पाठिमागून कोणीतरी त्याच्यावर गावठी रिवॉल्व्हरमधून गोळी झाडली होती.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या