

पुणे, (प्रतिनिधी) - गेल्यावर्षी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला दि.26 ला वर्ष पूर्ण होत आहे. त्या प्रकरणाशी संबंधी काही धागेदोरे पुण्यापर्यंत पोचल्याने पुणे पोलिस सतर्क झाले असून शहरात नाकाबंदी सुरू केली आहे.
पुणे हे लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्वाचे शहर आहे. येथे लष्कराची अनेक महत्वाची कार्यालये आहेत. त्याच बरोबर गेल्या काही वर्षात शहराची वाढ झाली असून रोजगारही उपलब्ध होत असल्याने पुण्यात उद्योगधंदे वाढत आहेत. बांधकाम व्यावसायात मुंबई नंतर पुण्याचाच नंबर लागतो.
या सर्व कारणांमुळे पुण्याचे महत्व वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत आहे. मुंबई हल्ल्याचा प्लॅनर व संशयीत दहशतवादी डेव्हीड हेडली याला अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना एफबीआयने अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या महितीच्या आधारे भारतातील तपास यंत्रणा एनआयएने देशात तपास सुरू केला आहे.
मुंबईवर हल्ला होण्यापूर्वी हेडली दोनवेळा पुण्यात येऊन गेल्याची महिती मिळाल्याने एनआयएचे पथक पुण्यात येऊन तपास करून गेले. त्याच्या दोन भेटींपैकी या वर्षी मार्च महिन्यात हेडली पुण्यातील कोरेगाव पार्क हॉटटेलमध्ये एक दिवस उतरला होता ही बाब तपासात उघड झाली आहे.
या सर्व कारणांमुळे पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रात्री नाकाबंदी करण्यात येत असून दिवसा गर्दीच्या वेळी काही महत्वाच्या चौकात किंवा फरसा लक्ष नसलेल्या चौकात बंदोबस्त ठेवण्यात सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांनी हेडली बाबत काय अधिक महिती काढली याबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या