

पुणे, (प्रतिनिधी) - मित्राच्या मेव्हण्याचा फ्लॅटच्या मालकाला मारल्या प्रकरणी पितापुत्रांना पोलिसांनी अटक केली आहे. तो मालका चंदननगरमध्ये कागदपत्रे काढण्यासाठी नोंदणी कार्यालयात आला असता त्याला त्यानी मारहाण केली.
याची पोलिसांनी दिलेली हकीकत अशी की, आबा बोराडे यांचा फुरसुंगीला फ्लॅट आहे. तो त्यांनी त्यांचा मेव्हणा सचिन रिकामे याला तात्परता रहाण्यासाठी दिला होता. तो फ्लॅट मोकळा करून दे असे बोराडे यांनी सचिनला सांगितले होते. तो काही फ्लॅट देइना म्हणून त्यांना संशय आला.
या संशयामुळे बोराडे हे चंगननगरच्या नोदणी कार्यालयात कागदपत्रे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी सचिनचे मित्र म्हणवणा-या विठ्ठल वागसकर व त्यांचा मुलगा भारत याने त्यांना मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला पळवून नेऊन उपाळा हॉटेलसमोरच्या इमारतीत कोंडून ठेवले होते. तेथून सुटका करून घेतल्यावर बोराडे यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर वागसकर पितापुत्राला अटक करण्यात आली.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या