

पुणे, (प्रतिनिधी) - कर्ज काढून डामडौलात लग्न करायचे पण त्यावेळी आलेल्या पाहुण्यांना प्रत्यक्षात घरातील परिस्थिती काय आहे हे महिती नसते अशी अवस्था राज्याच्या
पोलिस दलाची आहे. त्यात गेल्या वर्षभरात काही चांगल्या सुधारणा होण्यास सुरूवात
झाली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाचे अधुनिकीकरण करण्यासाठी
मोठा निधी शासनाने दिला आहे. तसेच एनएसजीच्या धर्तीवर र्फोसवन असे राज्याचे
कमांडो पथक स्थापन करण्यात आले आहे. अधुनिक शस्त्रांची खरेदी होत आहे. हे जरी
मुंबईपुरते असले तरी पुण्यासारख्या शहरातही पोलिस दलाच्या अधुनिकीकरणास सुरूवात
झाली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांची
स्थिती कशी आहे असे विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांना विचारले असता ते
म्हणाले की गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलिसांचे मनोबल खूपच उच्च आहे. त्याच बरोबर
पोलिस आता कोणतेही आव्हान झेलण्यास सज्ज आहेत. याला आता व्यावसायिक
प्रशिक्षणाची जोड असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्यावर्षी युवा राष्ट्रकूलस्पर्धेच्या निमित्ताने काही चांगली अधुनिक शशास्त्रे पोलिसांना
मिळण्यास सुरूवात झाली आहे. पण पोलिसांना कोणत्याही कामासाठी वापरण्याऐवजी
त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे गरजे आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे त्यांची
शाररीक क्षमता वाढे तसेच चांगली मानसिकता तयार होईल ज्याचा उपयोग जगात सध्या
काय चाचले आहे याची महिती घेण्यास पोलिसांना होईल. या सगळ्यातून त्यांची
कार्यक्षमता वाढल्याचे दिसून येईल.
याच विषया संदर्भात पोलिस शिपायांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र कर्ज काढून
डामडौलात लग्न करणा-याच्या घरात काय चालले आहे किंवा घरातील परिस्थिती काय
आहे हे महिती नसते अशी पोलिस दलाची अवस्था असल्याचे सांगितले. मात्र गेल्या
वर्षभरात काही चांगले बदल होण्यास सुरूवात झाली असल्याचे त्यांना आवर्जून नमूद केले.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या