Skip to content
जाहिरात

पाचवीला पुजलेल्या भिती साठीही औषध - डॉ. दिपाली लडकत

November 28, 2009

भिती सर्वांनाच वाटते पण काहींना कोणत्याही वेळी भितीच वाटत असते ती नेमकी कशाची असते ते त्यांनाही सांगता येत नाही. ही भिती काही काहीवेळा पूरतीच असल्याने अशी अनामिक भिती म्हणजे मनाचीच एक अवस्था असते. त्यामुळे ती पुष्पऔषधीने बरीही होऊ शकते. पण भिती ही अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते असे म्हणतात त्यांच्यासाठी ही पुष्पऔषधी डॉ. बाख यांनी मांडलेल्या गटातील प्रमुख औषध म्हणजे "ऍस्पेन" !
साधारण चाळीशातील महिला ज्यांच्या घरात सगळ काही आलबेल आहे.नवरा बायको दोघेही चांगल्या नोकरीत आहेत. त्यांच्या मुलीही चांगल्या शिकलेल्या, सुस्वभावी त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या एका मुलीचे लग्नही ठरले आहे.मुलीनेही स्थळ पाहूनच पसंती दिलेली म्हणजे लफड वगैरेची कटकट नव्हती. एकंदरीत चांगले ताणतणाव नसणारे हे कुटुंब आहे असे सुकृत दर्शनी तरी दिसते.नव्हे होतेच तसे ते.कारण त्यांच्यात भांडणे नव्हती. इतके सगळे चांगले असूनही ती बाई माझ्याकडे आली होती अर्थातच त्यांच कस चांगलं चाललय ते सांगायला नक्कीच आल्या नव्हत्या. त्या तक्रार घेऊन आल्या होत्या ती त्यांच्या डोकेदुखीची. आपल्याला काय होतय यावरून आमचे बोलणे सुरू झाले अन अचानक त्यांनी मला "डॉक्टर एक विचारू का? मला सारखी कशाची ना कशाची तरी भिती वाटते पण नेमकी कशाची वाटते ते सांगता येत नाही. पण काहीतरी वाईट घडणार आहे असे सारखे वाटत रहाते. असे कुणाला झाल्याचे तुमच्या पाहण्यात आले आहे का?" मला काही मानसिक आजार जडला आहे का हे त्या बाईंना जाणून घ्यायचे होत आणि त्यासाठी त्या माझ्याकडे डोकेदुखीचे कारण घेऊन आल्या होत्या.
त्या बाईंच्या मनात अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी सुरूवात केली आणि सुरूवातीलाच स्पष्ट केले की हा मानसिक आजार नसून स्वभाव दोष आहे. महिलांना विशेषतः 35 ते 45 वयोगटातील महिलांना मासिक पाळीच्यावेळी (मेनोपॉजच्या काळात) मानसिक अवस्थेत चढ उतार होत असतात अशा पद्धतीने त्यांना समाजावून त्यांना ऍस्पेन द्यायला सुरूवात केली.
एखाद्या व्यक्तीस अकारण छोट्या गोष्टींची भिती वाटायला लागते. त्यामागे काही ठोस घटना घडलेली नसते किंवा तशी कारणेही नसतात. अगदी त्या व्यक्तीचा आणि त्यांना वाटत असलेल्या भिती बद्द्लच्या गोष्टींचा काही दूरान्वये संबंध नसतो. असा व्यक्तींना ऍस्पेनचा उपयोग होतो. लहान मुलांपासून ते साठी पर्यंतच्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे लक्षणे अढळतात. काहीतरी वाईट घडणार असल्याची वाटणारी भिती ही अनेकदा मृत्यु किंवा धर्म संकल्पनेशी निगडीत असते. हा भयगंड मनात खोलवर रूजलेला असतो. तो या ऍस्पेनने दूर होऊ शकतो.
ऍस्पेनचे झाड खूप बारीक असते. पानाता देठाजवळील भाग चपटा असतो. या झाडाला मार्च, एप्रिल दरम्यान फुले येतात आणि फुले पानांच्या अगोदर येतात. आपला भितीमुळे जसा अंगाचा थरकाप होतो तशीच या झाडाची पाने कशानेही थरथरत असतात. फुले लालसर तपकीरी रंगांची, केसाळ आणि साधारण तीन इंच लांबीची असतात.
महत्वाची लक्षणे
- काहीतरी वाईट घडणार आहे अशी सतत भावना
- भितीने घाम येणे, अंगावर काटा येणे, छाती धडधडा उडणे
- एखटे असताना वरील लक्षणांची तीव्रता जास्त असते
- पण इतरांबरोबर असताना सुद्धा अशा व्यक्तींना सतत भिती वाटते.
- मानसिक दडपणाने त्यांच्या शरीरातील जळजळ वाढत.
- क्वचित प्रसंगी त्यांना चक्कर येऊन पडतो की काय असे वाटते.
- छोट्या मुंलांना तसेच मोठ्या व्यक्तींना रात्री भिती दायक स्वन्पे पडतात.
- आता आपल्याला भिती वाटेल म्हणून अधिच त्यांच्या मनात तयार झालेल्या भितीपोटी मृत्युंच्या कल्पनां त्यांच्या मनात सुरू होऊन त्याची भिती वाटणे सुरू होते.


डॉ. दीपाली लडकत
919422016830
dipali.ladkat@yahoo.com

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.