

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन दिवसांनी महापौरपदाची निवडणूक होत आहे. दोन्ही ठिकाणी जलसंपदा मंत्री अजित पवार यांचा वरचष्मा असून दोन्ही ठिकाणी उमेदवार देताना त्यांना जाणिवपूर्वक परप्रांतिय उमेदवार देऊन आपल्या पुढच्या स्थानिक राजकारणाची दिशा निश्चित केली आहे.
पुणे आणि त्या पाठोपाठ पिंपरीचिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. रोजगार
निर्मीतीमुळे या शहरांची लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड आहे. याचा परिणाम दोन्ही शहरात
वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांवरून दिसतात. ही वाढणारी लोकसंख्या राज्यातील किंवा
परराज्यातील लोकांची आहे हे मतदार यादीवर नजर टाकली की स्पष्ट होते.
गेली अडीच दशके पवारांचा जिल्ह्यातील राजकारणावर ताबा आहे. मात्र त्याचवेळी पुणे
आणि पिंपरी-चिंचवड शहरे ही त्यांच्या विऱोधाची केंद्रे राहिली आहेत.काँग्रेसचे माजी मंत्री
स्व. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचा ताबा
घेतला. मागच्यावेळी त्यांना काँग्रेसमधून शह बसत होता पण त्यातही त्यांनी विकासाची
कामे शहरात करून दाखवली आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवून त्यांनी राष्ट्रवादीची
निर्विवाद सत्ता तेथे आली. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी उघडपणे पक्षाचे
उमेदवार पाडत स्थानिक मंडळींना विधानसभेत निवडून आणले. आता स्थानिक
राजकारणात मात्र त्यांनी योगेश बहल यांच्या उमेदवारीने परप्रांतियांना जवळ करण्याचे
राजकारण सुरू केले आहे.
पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप आणि काँग्रेसला थोड्याफार फरकाने सारख्याच जागा मिळाल्या. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवूनही राष्ट्रवादीकडे आघाडीशिवाय पर्याय राहिला नाही. या निवडणुकीत अजित पवार यांचा बेस होता पुण्या भोवतीच्या गावातील मंडळी आणि तिथे त्यांना हवेतसे यश मिळालेही. पण शहरात त्यांना मार खाल्ला. याचा समन्वय साधण्यासाठी त्यांना आता शहरात यश मिळवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी परंपरागत पुणेकर मतदार सोडून बाहेरून आलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवायला सुरूवात केली आहे त्याचे पहिले पाऊल म्हणजे शीख समाजाचे मोहनसिंग राजपाल यांची उमेदवारी होय.
या परप्रांतियांच्या राजकारणातही अजित पवार यांनी त्यांचे कौशल्य दाखवले असून
त्यांनी युपीबिहारींबद्दल असलेला राग लक्षात घेऊन त्यांना दूर ठेवले आहे. त्याऐवजी
त्यांनी पंजाबी व शीख समाजाला उमेदवारी बहाल केली आहे. तेही दोन्ही ठिकाणची पदे
खुल्या गटासाठी असताना त्यांनी या दोघा तशा अर्थाने अल्पसंख्यांक असलेल्यांना जवळ
केले आहे. खासदार सुरेश कलमाडी यांची तर परप्रांतिय मतदार हीच व्होट बँक होती.
त्या बँकेवरच डल्ला मारण्यास अजित पवार यांनी महापौर निवडणुकीच्या निमित्ताने सुरूवात
केली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या