

पुणे, (प्रतिनिधी) - नोकरी करत नाही म्हणून जाब विचारणा-या मुलाने बापाच्या छाती व पोटावर सपासप वार केले. त्यामुळे बाप मरण पावला. पोलिसांना मुलाला अटक केली आहे.
स्टेट बँकेतून निवृत्त झालेले किर्तीकुमार चंदूलाल शहा असे त्या दुर्दैवी बापाचे नाव आहे.
त्यांना चिकू नावाचा चाळीस वर्षाचा मुलगा असून वैशाली मुलगी आहे. चिकूचे लग्न झाले असून त्याला एक मूल आहे पण त्याची पत्नी माहेरीच गेली दीड वर्ष रहाते.
कामधंदा किंवा नोकरी न करण्यावरून किर्तीकुमार व चिकू यांच्यात सकाळी वाद झाला.
त्यानंतर चिकू घराबाहेर गेला. काहीवेळाने किर्तीकुमार कामासाठी बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या चिकूने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या पाठीत व पोटावर पाचसहा वार केले. त्यामुळे ओरडलेल्या किर्तीकुमार यांच्या आवाज ऐकून त्यांची पत्नी ज्योती व मुलगी वाहेर आल्या. त्यावेळी किर्तीकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर चिकू हातात चाकू घेऊन उभा असलेला त्यांनी बघितला.त्याला तिघांनी पकडलेले होते.
स्थानिक नागरीकांनी ही घटना पोलिसांना कळवली. त्यांनी किर्तीकुमार यांना रूग्णालयात हलवले पण त्यापूर्वीच ते मरण पावले होते. किर्तीकुमार यांना चिकूसह रमेश,नवीन व शैलेश अशी चार मुले व वैशाली, पल्लवी अशा दोन मुली आहेत.
त्यातील पल्लवी ही विवाहित असली तरी गेले काही दिवस ती माहेरीच रहात आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या