

पुणे, (प्रतिनिधी) - पुणे शहरातील रस्ते वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. त्याच बरोबर वाहने लावण्यासाठीच्या (पार्कींगसाठीच्या) जागाही अपु-या आहेत. जेथे जागा मिळेत तेथे वाहन लावले जाते व नंतर भांडणे होतात. पण आता हे केवळ शाब्दीक भांडणांपुरतेच राहिले नसून साधी सायकल लावण्यावरून खून हडपसरमध्ये झाला आहे.
दारासमोर सायकल लावू नको असे सांगितले म्हणून रिक्षाचालकावर त्या सायकल
मालकाने कोयत्याने खूनी हल्ला केला. ही घटना हडपसरमधीस साडेसतरा नळी येथे सकाळी घडली. पोलिसांनी हल्लेखोर संतोष कुमावत याला अटक केली असन त्याचे वडिल गोविंद यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यातील कुमावत यांच्या शेजरी रहाणारे संदीप बाळासाहेब लोणकर यांची रिक्षा आहे. ते
सकाळी रिक्षेतून घरी आले तेव्हा त्यांच्या दारात कुमावत याची सायलक होती. घरात
जाण्यासाठी अडचण होते म्हणून तू दारात सायकल लावू नको असे लोणकर यांनी वारंवार
कुमावतला सांगितले होते पण तो तशीच सायकल लावत होता. सकाळी त्याची आपल्या
घरासमोर असलेली सायकल लोणकर यांनी हाताने बाजूला काढत असताना मागून गोविंद
कुमावत यांनी त्याला मिठी मारली.
त्याचवेळी संतोष यांने कोयत्याने संदीपवर वार केले. वार चुकवण्यात संदीपच्या हातावर
वार बसून त्याची डाव्या हाताची किरंगळी तुटली आणि अन्य दोन बोटांना जख्म झाली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोणकर यांनी त्यातून आपली सुटका करून घेतली आणि
कालव्याच्या बाजूने पळू लागले. त्यांच्या पाठलाग करणा-या संतोषने आणखी एक
केलेला वार संदीपच्या डोक्यात बसला. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू
आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या